June 8, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बाणेर बालेवाडी येथे मोठ्या जल्लोषात स्वागत..

बाणेर :

महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी पुन्हा विराजमान झाल्यानंतर प्रथमच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बाणेर बालेवाडी सुस आणि म्हाळुंगे या परिसरांत भेट दिली असता पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात त्यांचे स्वागत केले.

राज्यातील सत्ते सामील झाल्यानंतर बहुतांशी कार्यकर्ते हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत राहिले असल्याने बाणेर, बालेवाडी, सुस आणि म्हाळुंगे परिसरात मोठ्या उत्साहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वागत केले.

यावेळी माजी समिती चेअरमन माजी नगरसेवक बाबुराव चांदेरे, पुणे शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष समीर चांदेरे, माजी नगरसेविका रोहिणी चिमटे, राहुल बालवडकर, मनोज बालवडकर, नितिन कळमकर, आणि कार्यकर्ते उपस्थित होते.