बाणेर :
बाणेर परिसरातील नागरिकांची अनेक वर्षांची प्रतीक्षा अखेर संपुष्टात आली आहे. ननवरे चौक ते पॅनकार्ड क्लब रस्ता कामाने तिसऱ्या दिवशीही वेग घेतला असून परिसरातील पायाभूत सुविधांमध्ये मोठी भर पडली आहे. या रस्त्यामुळे केवळ ननवरे चौकच नव्हे तर बाणेर, बालेवाडी, सूस व म्हाळुंगे भागातील वाहतुकीची समस्या दूर होऊन प्रवास अधिक सुरळीत आणि सुरक्षित होणार आहे.
नागरिकांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा करून व बैठकींतून ठोस मांडणी करून हे काम मार्गी लावले. त्यामुळे आज या विकासकामाला प्रत्यक्ष गती मिळाली आहे. परिसरातील सोसायट्यांमधील नागरिक दररोज कामाची पाहणी करत असून समाधान व्यक्त करत आहेत.
पुणे महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांच्या उपस्थितीत हे काम गतीने सुरू आहे. यावेळी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल बालवडकर आणि पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस युवक अध्यक्ष समीर चांदेरे हे देखील उपस्थित होते.
रस्त्याच्या माध्यमातून केवळ वाहतुकीची सोयच सुधारत नाही, तर परिसराचे संपूर्ण स्वरूप बदलत असल्याचे नागरिकांनी सांगितले. बाणेरवासीयांनी आपल्या हक्कांसाठी सजगतेने भूमिका घेतल्यामुळे हा विकास साध्य झाला असून हा बदल सकारात्मक दिशेने वाटचाल करणारा ठरत आहे.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी