बाणेर :
नवरात्री हा भारतीय संस्कृतीतील आनंद, श्रद्धा आणि परंपरेचा उत्सव मानला जातो. या उत्सवाची चाहूल लागताच प्रत्येकाला दांडिया आणि गरबा नृत्याचा उत्साह चढतो. हाच उत्साह आणि आनंद महिला बचत गटांना अनुभवता यावा या हेतूने वामा वुमन्स क्लब तर्फे सौ. पूनम विशाल विधाते (कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व अध्यक्ष, वामन क्लब) यांच्या वतीने भव्य गरबा वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले.
या वर्कशॉपमध्ये महिलांना पारंपरिक गरबा स्टेप्स, दांडियाचे विविध प्रकार, ताल, लय आणि नृत्याच्या सौंदर्याचा संगम अनुभवायला मिळाला. प्रशिक्षकांनी महिलांना केवळ स्टेप्स शिकवल्या नाहीत तर नृत्यातील आत्मीयता, ऊर्जाशक्ती आणि सांस्कृतिक वारसा यांचीही जाणीव करून दिली.
सहभागी झालेल्या सर्व महिला मोठ्या उत्साहाने गरब्याच्या तालावर नाचल्या आणि संपूर्ण वातावरणात जल्लोष आणि रंगत निर्माण झाली. अनेक महिलांसाठी ही नृत्यकला शिकण्याची एक आगळीवेगळी संधी होती.
या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे नवरात्रीचा जल्लोष, परंपरेचा ठेवा आणि स्त्रीशक्तीची ऊर्जा यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. महिलांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि आत्मविश्वास हा या वर्कशॉपच्या यशाचा खरा पुरावा होता.
सौ. पूनम विशाल विधाते यांनी या उपक्रमाद्वारे पुन्हा एकदा महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि परंपरेच्या जपणुकीसाठी आपली कटिबद्धता दर्शवली. सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रात वामा वुमन्स क्लब सातत्याने महिलांसाठी विविध उपक्रम राबवत आहे.
नवरात्रीसारख्या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर महिलांना एकत्र आणून आनंद, नृत्य आणि परंपरा अनुभवण्याची संधी उपलब्ध करून देणे हा वर्कशॉपचा मुख्य हेतू ठरला.



More Stories
पाषाण कार्यालयात जागतिक योग दिनानिमित्त योग शिबिराचे आयोजन
परिहार चौक परिसरातील अतिक्रमणावर कारवाईचे आश्वासन; सनी निम्हण यांचा पाठपुरावा
पेरिविंकल स्कूलमध्ये ‘योगा फॉर हार्मनी, हेल्थ अँड हॅपिनेस’ अंतर्गत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा