बाणेर :
माजी नगरसेविका ज्योती गणेश कळमकर आणि भाजपा नेते श्री गणेश कळमकर यांनी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून खंडेराया प्रतिष्ठान आणि SKP कॅम्पस येथील शाळा-कॉलेजांमधील ७०० विद्यार्थी आणि ३०० नागरिकांसाठी शिवसृष्टी सहलीचे आयोजन केले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य, पराक्रम आणि दूरदृष्टी दर्शवणारी शिवसृष्टी पाहण्याची संधी या सहलीमुळे सर्वांना मिळाली.
या भेटीदरम्यान, उपस्थितांनी विविध दृश्य माध्यमांतून उलगडलेला स्वराज्याचा इतिहास आणि महाराजांच्या जीवनातील महत्त्वाचे प्रसंग अनुभवले.
याबद्दल बोलताना माजी नगरसेविका ज्योती कळमकर म्हणाल्या, “स्वातंत्र्य दिनानिमित्त छत्रपतींच्या इतिहासाचा अनुभव घेणे ही एक अभिमानाची गोष्ट आहे. या सहलीमुळे विद्यार्थ्यांना आपला इतिहास, संस्कृती आणि देशभक्तीचा वारसा अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता आला. आम्ही आवाहन करतो की प्रत्येकाने एकदा तरी आंबेगाव येथील शिवसृष्टीला भेट द्यावी.”
ही अविस्मरणीय सहल यशस्वी झाल्याचे त्यांनी सांगितले. या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्वांनी आनंद व्यक्त केला आणि ही सहल प्रेरणादायी ठरल्याचे सांगितले.



More Stories
*बावधन च्या पेरीविंकल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सोनक टोयोटाच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण जनजागृती व वृक्षारोपण अभियान उत्साहात संपन्न!!!*
*ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरा*
“वीज सडक पाणी” प्रश्न, बालेवाडी वेलफेअर फेडरेशनने मांडला महाराष्ट्राच्या मंत्रालयात.