बालेवाडी :
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत बालेवाडी, पुणे येथील समन्वय लेन परिसरात एक विशेष वृक्षारोपण मोहीम राबवण्यात आली. एकेकाळी कचरा आणि अस्वच्छतेमुळे ओळखला जाणारा हा परिसर मा. स्थायी समिती अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल बालवडकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर चे युवक अध्यक्ष समीर चांदेरे यांच्या माध्यमातून स्वच्छ करण्यात आलेल्या अम्युनिटी स्पेस ची जागा आता या उपक्रमामुळे स्वच्छ व सुंदर झाली आहे. या उपक्रमाने केवळ परिसराचे रूपच बदलले नाही, तर स्वच्छता आणि पर्यावरणाविषयी जनजागृती करण्याचा महत्त्वपूर्ण संदेशही दिला.
या उपक्रमासाठी समन्वय लेनमधील के स्क्वेअर, गोल्डन कॅसल, कोणार्क टॉवर, अरियन एम्पायर, क्लोरिस सोसायटी मधील रहिवाशांनी एकत्र येत मेहनत घेतली. त्यांच्या सहकार्यामुळे परिसरातील कचरा साफ करून राहुल बालवडकर व समीर चांदेरे यांच्या वतीने ही जागा वृक्षारोपणासाठी तयार करण्यात आली. या सामूहिक प्रयत्नांमुळेच हे काम यशस्वी झाले.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहर युवक कार्याध्यक्ष मनोज बालवडकर, पांडुरंग साळेगावकर, वर्षा मॅडम (मंडल अधिकारी), प्रकाश तात्या बालवडकर, शशिकांत भाऊ बालवडकर, मनोज बालवडकर पाटील, अमेयजी जगताप, ॲड. माशाळकर सर, राहुलजी पाटील, ॲड. तारे, संदीप बालवडकर, आनंदा कांबळे पाटील, चेतन बालवडकर, विद्याधर तात्या गांधीले, अशोक तात्या बालवडकर, बाळकृष्ण बालवडकर, सुरेश बालवडकर, मयूर थानवी, संदीप मिराशी आदी मान्यवर उपस्थित होते.
या मोहिमेमुळे बालेवाडीतील समन्वय लेन आता स्वच्छ आणि सुंदर झाली आहे. या भागातील हिरवळ भविष्यात या भागाचे सौंदर्य वाढवेल, अशी अपेक्षा आहे.



More Stories
रणवीर हनुमान तरुण मंडळ वरची तालीम औंध मंडळ वतीने १११ वर्ष निमित्ताने आयोजित बाल चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
*मुळशी तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पेरिविंकलच्या खेळाडूंची दमदार कामगिरी!!*
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!