बाणेर :
बालेवाडी येथे ७९ व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून सक्षम युवा फाऊंडेशनतर्फे वृक्षारोपणाचा सुंदर उपक्रम राबविण्यात आला. हा उपक्रम केवळ झाडे लावण्यापुरता मर्यादित न राहता त्यांच्या संगोपनाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारण्याचा निर्धार संस्थेने केला.
सक्षम युवा फाऊंडेशनने पर्यावरण रक्षणासाठी ही दीर्घकालीन व सकारात्मक जबाबदारी अंगीकारली असून झाडांचे संगोपन करण्याचे वचन दिले आहे. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी अशा उपक्रमांची आजच्या काळात अत्यंत आवश्यकता असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
या प्रसंगी सक्षम युवा फाऊंडेशनच्या टीमचे विशेष अभिनंदन करण्यात आले. उपस्थितांनी स्वतःही झाडे लावून त्यांची देखभाल करण्याची जबाबदारी स्वीकारली.
या कार्यक्रमात सक्षम युवा फाऊंडेशन, बाणेर-बालेवाडी नागरीक मंच, नवचैतन्य हास्य क्लब तसेच मोझे कॉलेजचे सर्व शिक्षक उपस्थित होते.



More Stories
रणवीर हनुमान तरुण मंडळ वरची तालीम औंध मंडळ वतीने १११ वर्ष निमित्ताने आयोजित बाल चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
*मुळशी तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पेरिविंकलच्या खेळाडूंची दमदार कामगिरी!!*
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!