सुतारवाडी , १५ ऑगस्ट:
सुतारवाडी शिवसेना शाखा, सनशाइन प्री स्कूल आणि फकिरा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यदिनाचा ७९ वा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात ध्वजारोहण, लहान मुलांची भाषणे आणि खाऊ वाटपाचे आयोजन करण्यात आले होते.
ध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्रम सुतारवाडी येथे पार पडला. यावेळी सनशाइन प्री स्कूलच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गाणी व भाषणे सादर करून उपस्थितांची मने जिंकली. यानंतर सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला.
या कार्यक्रमाला बाळासाहेब रणपिसे, मधुकर निम्हण, संजय निम्हण, अशोक दळवी, नारायण जाधव, राम चव्हाण, सुहास जाधव, शंकर सुतार अविनाश होडगे, विकास जाधव, सुनील तोंडे,मोहन कांबळे, अॅड लक्ष्मण करे साहेब, सुनील तोंडे,सचिन सुतार, सुशील सरकाटे, मनीष चक्रनारायण, देवेंद्र सुतार, भिमराव सुतार, गणेश मोरे, उमेश गुजर, दशरथ खेडेकर, संतोष लोंढे, छाया ताई रणपिसे, स्वाती रणपिसे विभाग संघटिका, रुपाली सुतार, सोनाली सुतार, सुनिता रानवाडे शाखा संघटिका, पुजा महेश सुतार, वृषाली आमोल फाले, चंद्रभागा सुतार, मीनाक्षी पालकर, पल्लवी शिंदे, प्राजक्ता सरगुडे, सुवर्णा गुंडगळ, रोहन कदम, रोहन गव्हाणे, रोहित गव्हाणे, प्रसाद दादा पवार, जिवन सुर्वे, वेदांत गव्हाणे, सार्थक रणपिसे, संकेत सुतार, तन्मय सुतार, प्रथमेश रणपिसे, आदित्य साबळे, सनशाईन प्रि स्कूल मधील पालक, इतर मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी शिवदूत महेश भीमराव सुतार आणि शाखाप्रमुख अमोल अनिल फाले यांनी विशेष मेहनत घेतली.
हा कार्यक्रम सुतारवाडी परिसरातील एक आदर्श उपक्रम ठरला असून, लहान मुलांमध्ये देशभक्तीची भावना रुजवण्यासाठी तो महत्त्वाचा होता.



More Stories
रणवीर हनुमान तरुण मंडळ वरची तालीम औंध मंडळ वतीने १११ वर्ष निमित्ताने आयोजित बाल चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
*मुळशी तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पेरिविंकलच्या खेळाडूंची दमदार कामगिरी!!*
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!