बालेवाडी :
बालेवाडी येथील समन्वय लेन परिसरात सोसायटी दिशादर्शक माहितीफलकाचे अनावरण आज मोठ्या उत्साहात पार पडले. महाराष्ट्राचे माजी वेगवान गोलंदाज व माजी भारतीय क्रिकेटपटू पांडुरंग साळगांवकर सर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहर उपाध्यक्ष राहुल दादा बालवडकर, ॲड. सिद्धाप्पा माशाळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर युवक अध्यक्ष समीर चांदेरे यांच्या हस्ते हा उपक्रम संपन्न झाला.
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून करण्यात आलेल्या या अनावरणामुळे स्थानिक नागरिकांची दिशादर्शक माहितीअभावी होणारी गैरसोय दूर झाली आहे. परिसरातील सोसायट्यांचे स्पष्ट मार्गदर्शन मिळाल्यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्या रहिवाशांना तसेच पाहुण्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या प्रसंगी अमेय भाऊ जगताप, मनोज दादा बालवडकर, प्रकाश तात्या बालवडकर, विद्याधर तात्या गांधीले, चेतन दाजी बालवडकर, शशिकांत भाऊ बालवडकर, हर्षल भाऊ तापकीर, अर्थव बालवडकर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.





























More Stories
तायक्वांदो चॅम्पियनशिपमध्ये पेरिविंकल पौडच्या विद्यार्थ्यांची दमदार कामगिरी
सूस-नांदे परिसरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांचा आणि सनीज वर्ल्डचा पुढाकार
“तायक्वांदोच्या मैदानात पेरिविंकलचा दबदबा; १६ पदकांची शानदार कमाई!”