बाणेर :
राष्ट्रीय काँग्रेस कमिटी पुणे शहरचे उपाध्यक्ष जीवन चाकणकर यांच्या वाढदिवसानिमित्त जीवन चाकणकर सोशल वेल्फेअर फाउंडेशन तर्फे महिलांसाठी विशेष आरोग्यविषयक उपक्रम तसेच रक्तदानाचे महत्त्व लक्षात घेता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या उपक्रमांतर्गत महिला भगिनींसाठी महिलांच्या ब्रेस्ट आणि गर्भपिशवी भागांवर होणाऱ्या कर्करोगाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी नामांकित महिला तज्ज्ञ उपस्थित राहणार आहेत. महिलांना कर्करोग प्रतिबंध, तपासणी व उपचाराविषयी महत्त्वपूर्ण माहिती दिली जाणार आहे.
याचबरोबर रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून रक्ताच तुडवडा लक्षात घेऊन समाजातील आरोग्यदायी वातावरणासाठी ऐच्छिक रक्तदान शिबिर देखील घेण्यात येणार आहे. हा कार्यक्रम बुधवार, दि. 20 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी १०.०० ते दुपारी २.०० या वेळेत कुंदन गार्डन मंगल कार्यालय, बाणेर येथे संपन्न होणार आहे.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी