बाणेर :
बाणेर, बालेवाडी, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, पाषाण, सुस आणि महाळुंगे परिसरातील सर्वात मोठा दहीहंडी उत्सव २०२५ जय्यत तयारीनिशी आणि प्रचंड उत्साहात पार पडला. जयेश मुरकुटे सोशल फाउंडेशन यांच्या वतीने भव्यदिव्य पद्धतीने हा सोहळा आयोजित करण्यात आला होता.
या सोहळ्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे पुणे शहराध्यक्ष मा. प्रशांत दादा जगताप, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष तुषार दादा कामठे विशेष उपस्थित होते. यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रशांत दादा जगताप यांनी जयेश मुरकुटे यांच्या उमेदवारीची औपचारिक घोषणा करून वातावरणाला राजकीय रंगही दिला.
उत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणून लोकप्रिय अभिनेत्री सई मांजरेकर आणि ‘बिग बॉस’ फेम जान्हवी किल्लेकर यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
यावेळी समस्त मुरकुटे परिवार तसेच औंध, बाणेर, बालेवाडी, सुस, महाळुंगे, पाषाण, सोमेश्वरवाडी आणि सुतारवाडी परिसरातील ग्रामस्थ व सर्व वयोगटातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांनी केलेल्या रोमांचक खेळांनी उपस्थितांना भारावून टाकले. पुण्यातील गोविंदा पथकाने ही दहीहंडी फोडण्याचा मान मिळवला.
हा दहीहंडी उत्सव केवळ सांस्कृतिक आणि धार्मिक सोहळा न ठरता सामाजिक एकात्मतेचा आणि राजकीय संदेश देणारा ऐतिहासिक सोहळा ठरला.



More Stories
बालेवाडीतील राजाभाऊ गुडदे फाउंडेशनतर्फे स्नेहवनमध्ये ‘बालदीपोत्सव ५’ उत्साहात साजरा, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांतील १८० मुलांसोबत दिवाळीचा आनंद द्विगुणित..
*औंध-बोपोडीतील चिमुकल्यांच्या कल्पकतेला मिळाली नवी झळाळी!**मोफत आकाशकंदील कार्यशाळेतून बालसर्जनशीलतेला प्रोत्साहन**नगरसेवक सनी विनायक निम्हण यांच्या पुढाकारातून विद्यार्थ्यांसाठी सामाजिक उपक्रम; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग*
‘मिस अँड मिसेस हेरिटेज इंडिया २०२६’चा ऐतिहासिक सोहळा दिमाखात संपन्न!