September 18, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

पर्यावरणाची काळजी घेत साजरा करूया गणेशोत्सव: बाणेर येथे ज्योती कळमकर यांच्या वतीने इको-फ्रेंडली गणपती मेकिंग कार्यशाळा

बाणेर :

गणेशोत्सव जवळ येत असून, बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू झाली आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या उद्देशाने, बाणेर येथे माजी नगरसेविका सौ. ज्योती गणेश कळमकर आणि भाजप पुणे शहराचे सरचिटणीस श्री. गणेश ज्ञानोबा कळमकर यांच्या वतीने ‘इको-फ्रेंडली गणपती मेकिंग कार्यशाळेचे’ आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत सहभागी होऊन शाडू मातीपासून स्वतःच्या हाताने गणपतीची मूर्ती तयार करण्याची संधी बाणेर, बालेवाडी, पाषाण सुतारवाडी, सोमेश्वरवाडी, सूस, महाळुंगे परिसरातील मुलांना व नागरिकांना मिळणार आहे.

२३ आणि २४ ऑगस्ट २०२५ रोजी अमर बिझनेस झोन टेरेसवर, गणराज चौक, बाणेर, पुणे येथे ही कार्यशाळा होणार आहे. तसेच मूर्ती बनवण्यासाठी लागणारे साहित्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. यावेळी उपस्थितांसाठी स्नेहभोजन व नाश्त्याची देखील सोय आयोजकानी केलेली आहे.

या कार्यशाळेत कुटुंबीयांसह सहभागी होऊन निसर्गपूरक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचा संदेश देण्यात येणार आहे. सहभागी होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आकर्षक भेटवस्तू आणि प्रशस्तीपत्र दिले जाणार आहे.

इच्छुकांनी नावनोंदणीसाठी ७५१७९९२४२४ किंवा ७०५७९९२४२४ या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच, गुगल फॉर्मवरही नोंदणी करता येईल.

गुगल फॉर्म लिंक: https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeQM2SDqzFpBowq47v_OCbdcbeiAnWAlZlQ8PncpiLkIpn-Pg/viewform?edit2=2_ABaOnueBHTi7rAwGy-6Og90ltankrEFL_S28pCcD4iRVcTCUbrPXekO39tclQ84B2w

 

You may have missed