बालेवाडी :-
१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पुणे यांच्या वतीने बालेवाडी येथे आधार कार्ड मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. राहुलदादा उत्तम बालवडकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात १३ ते १४ ऑगस्ट २०२५ या दोन दिवसांत आयोजित केलेल्या या शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत सुरू असलेल्या या शिबिरात आधार कार्डशी संबंधित विविध सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. यामध्ये नवीन आधार कार्ड काढणे, आधार कार्डमधील दुरुस्ती, मोबाईल नंबर लिंक करणे, फोटो बदलणे, नाव आणि पत्ता बदलणे, तसेच हरवलेल्या किंवा डुप्लिकेट आधार कार्डची प्रत काढून देणे, स्मार्ट कार्ड तयार करून देणे यांसारख्या सुविधांचा समावेश होता.
या शिबिरात मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून आधार कार्ड संबंधित कामांचा लाभ घेतला. नागरिकांच्या सहभागाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर उपाध्यक्ष राहुल बालवडकर यांनी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले. समाजातील गरजू लोकांना मदत करण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम भविष्यातही राबवले जातील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
या मोहिमेमुळे अनेक नागरिकांची आधार कार्ड संबंधित कामे सोयीस्करपणे पूर्ण झाली आणि त्यांना सरकारी कार्यालयांच्या फेऱ्या माराव्या लागल्या नाहीत. या यशस्वी आयोजनाबद्दल परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी