बाणेर :
बाणेर-सुस हद्दीतील त्रिमूर्ती एलीना सोसायटीत नागरी समस्यांवर चर्चा करण्यासाठी आयोजित बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर युवक अध्यक्ष समीर चांदेरे यांनी उपस्थिती लावली.
या बैठकीदरम्यान सोसायटीमधील रहिवाशांनी परिसरातील विविध नागरी अडचणी, पायाभूत सुविधांची कमतरता, वाहतूक व्यवस्थेतील अडथळे आणि पाणी-वाहनतळ व्यवस्थेसंबंधी मुद्दे मांडले.
सर्व समस्यांवर सखोल चर्चा करतानाच, पुणे महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष मा. श्री. बाबुराव चांदेरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या समस्या लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन समीर चांदेरे यांनी रहिवाशांना दिले.
नागरिकांच्या प्रश्नांवर सकारात्मक दृष्टिकोन ठेवून त्वरित कार्यवाही करण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला. बैठकीस सोसायटीचे पदाधिकारी, रहिवासी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





























More Stories
तायक्वांदो चॅम्पियनशिपमध्ये पेरिविंकल पौडच्या विद्यार्थ्यांची दमदार कामगिरी
सूस-नांदे परिसरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांचा आणि सनीज वर्ल्डचा पुढाकार
“तायक्वांदोच्या मैदानात पेरिविंकलचा दबदबा; १६ पदकांची शानदार कमाई!”