पिरंगुट :
पेरिविंकल इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पिरंगुट येथे विद्यार्थ्यांसाठी पहिल्यांदाच मोबाईल अॅपच्या साहाय्याने ईव्हीएम मशिनद्वारे मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. विद्यार्थ्यांना लोकशाही प्रक्रियेची जाणीव व्हावी व प्रत्यक्ष मतदानाचा अनुभव यावा, या उद्देशाने हा अभिनव उपक्रम यशस्वीपणे पार पडला.
विशेष म्हणजे इयत्ता १ ली ते १० वीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी मतदार म्हणून सहभाग घेतला. त्यांच्यासाठी मतदार यादी तयार करण्यात आली होती. ठरवलेल्या वेळेनुसार सर्व विद्यार्थ्यांनी रांगेत उभे राहत मोबाईल अॅपमधील ईव्हीएम मशीनद्वारे आपला मतदानाचा हक्क बजावला. या प्रक्रियेमुळे सर्व वयोगटातील विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्यांची बीजे पेरली गेली.या उपक्रमामुळे 10वीच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेबाबत कृतीशील अनुभव मिळाला. या शालेय निवडणुकीत विविध पदांसाठी विद्यार्थ्यांनी उमेदवारी अर्ज भरले, प्रचार केला आणि मोठ्या उत्साहात निवडणूक झाली.
या उपक्रमासाठी शाळेचे संस्थापक श्री. राजेंद्र बांदल, संचालिका सौ. रेखा बांदल, संचालिका कु. शिवानी बांदल यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्या सौ. आसावरी हंचाटे यांच्या मार्गदर्शनाखाली माध्यमिक विभागप्रमुख पूनम पांढरे, प्राथमिक विभागप्रमुख सना इनामदार, पूर्व प्राथमिक विभागप्रमुख पल्लवी नारखेडे तसेच ऋग्वेद हाऊसचे शिक्षक व इतर शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी