बाणेर :
बाणेर येथील अंबर सोसायटीसह इतर रहिवाशी संकुलातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहर युवक अध्यक्ष समीर चांदेरे यांनी पुढाकार घेतला आहे. नुकत्याच झालेल्या बैठकीनंतर आज त्यांनी महानगरपालिकेचे अधिकारी आणि स्थानिक रहिवाशांसह बाणेर-सूस हद्दीतील प्रलंबित विकासकामांची पाहणी केली. या कामांना लवकरच गती देऊन ती मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
मा. स्थायी समिती अध्यक्ष मा. श्री. बाबुराव चांदेरे यांच्या मार्गदर्शनाखाली अंबर सोसायटीसह इतर रहिवाशी संकुलातील सदस्यांसोबत विविध समस्यांवर नुकतीच सखोल चर्चा करण्यात आली होती. या चर्चेच्या अनुषंगानेच आज पाहणी दौरा आयोजित करण्यात आला होता.
प्रलंबित समस्यांची पाहणी
या पाहणी दौऱ्यात बाणेर-सूस परिसरातील २४ मीटरचा अपूर्ण डीपी रस्ता, पदपथ, पथदिवे आणि ड्रेनेज यासारख्या प्रलंबित कामांची पाहणी करण्यात आली. या समस्यांमुळे स्थानिक नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
सोसायटीमधील रहिवाशांच्या मागण्या समजून घेतल्यानंतर समीर चांदेरे यांनी महानगरपालिका अधिकाऱ्यांशी चर्चा केली. रहिवाशांच्या मागणीनुसार, ही सर्व प्रलंबित कामे महानगरपालिका अधिकाऱ्यांच्या सहकार्याने तातडीने पूर्ण करून लवकरच मार्गी लावण्याबाबत त्यांनी रहिवाशांना आश्वस्त केले. यामुळे बाणेर-सूस परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.




More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी