पिरंगुट (10 जुलै 2025):
पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अॅण्ड ज्युनियर कॉलेज, पिरंगुट येथे गुरुपौर्णिमा दिनाचे औचित्य साधून एक भव्य व दिव्य कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. ज्ञान, श्रद्धा, संस्कार आणि कृतज्ञता यांचे एकत्रित रूप असलेला हा सोहळा विद्यार्थ्यांच्या मनात गुरूविषयी आदरभाव आणि जीवनमूल्यांची प्रेरणा देणारा ठरला.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती वंदनेने झाली. विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी एकत्र येऊन महर्षी वेद व्यासांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली आणि ‘गुरूर्ब्रह्मा, गुरूर्विष्णुः…’ या मंत्रांनी संपूर्ण सभागृह भक्तिमय केले.
विद्यार्थ्यांनी गुरु पूजन करून आपल्या जीवनात गुरूचे स्थान किती मोठे आहे हे दर्शवले. इयत्ता 9 वीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्याने वातावरणात उत्साह निर्माण केला. “गुरु-शिष्य परंपरेतील जोड्या” या विशेष नाट्यसादरीकरणात गुरु-शिष्य संबंधांचे अत्यंत समर्पक सादरीकरण केले. प्रत्येक प्रसंगातून विद्यार्थ्यांना जीवनमूल्ये व संस्कार शिकायला मिळाले.त्यानंतर शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. संचालिका सौ. रेखा बांदल मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले, “गुरू हा जीवनातील दिशा दाखवणारा दीपस्तंभ असतो. विद्यार्थ्यांनी केवळ यशस्वीच नव्हे, तर चांगले माणूस बनण्याचे ध्येय ठेवावे.”
कार्यक्रमास संस्थापक व संचालक श्री. राजेंद्र बांदल सर व संचालिका कु. शिवानी बांदल मॅडम यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात बोलताना प्राचार्या सौ. आसावरी हंचाटे मॅडम म्हणाल्या, “गुरुपौर्णिमा हा दिवस विद्यार्थ्यांमध्ये भक्ती, संस्कार आणि पर्यावरणस्नेही दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी अत्यंत योग्य आहे”. महर्षी व्यास आणि भगवान गणपती यांच्यातील एक सुंदर गोष्ट सांगून गुरुशिष्य परंपरेचे महत्व पटवून दिले. शिक्षणासोबत जीवनमूल्ये रुजवण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो.
कार्यक्रमाचे यशस्वी संयोजन माध्यमिक विभागप्रमुख सौ. पूनम पांढरे, प्राथमिक विभागप्रमुख सौ. सना इनामदार, पूर्व-प्राथमिक विभागप्रमुख सौ. पल्लवी नारखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली झाले.ऋग्वेद हाऊसचे शिक्षक व इतर शिक्षकांच्या सहकार्यामुळे संपूर्ण कार्यक्रम सुरेख आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला.


More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी