विद्यापीठ :
रोटरी क्लब ऑफ पुणे बाणेर यांच्या वतीने महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या विद्यापीठ हायस्कूल, पुणे येथे कृषी दिन आणि वैद्यक दिनाचे औचित्य साधून विविध उपक्रमांचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
कृषी दिनानिमित्त पर्यावरणपूरक संदेश:
कृषी दिनाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी प्रशालेच्या आवारात बकुळीच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. याशिवाय, पर्यावरणात्मक संदेश देणारी भेटकार्ड स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी या चित्रकला स्पर्धेत मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे बक्षीस देऊन गौरवण्यात आले. या प्रसंगी दैविक कारीया याच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
वैद्यक दिनानिमित्त आरोग्य जनजागृती:
वैद्यकीय दिनानिमित्त विद्यार्थ्यांना आरोग्याविषयी जाणीव निर्माण व्हावी या उद्देशाने डॉ. शेखर बेनाडे आणि डॉ. रूपाली बेनाडे यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी आयुर्वेदाचे जीवनातील महत्त्व तसेच योग आणि प्राणायाम यांचे महत्त्व आपल्या व्याख्यानातून विद्यार्थ्यांना पटवून दिले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक विष्णू मोरे यांनी केले, तर गौरी गोळे यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली सैंधाणे यांनी केले.
या प्रसंगी रोटरी क्लबच्या अध्यक्षा प्रिया कारीया, रिसोड रिसबूड, रूपाली जगताप, कॅप्टन नारकर, जिग्नेश कारीया, सपना आगरवाल, मीनाक्षी दुसाने, शामला सुरेश, गिरमे, अर्चना आणि प्रशालेतील शिक्षक स्नेहा वाघमारे, संध्या आवेकर, मनोहर निकम, तेजस्विनी निरगुडे, रेश्मा देवकाते, योगेश्वर चव्हाण, अभंग पल्लवी हे उपस्थित होते.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी