बाणेर :
देहरादून येथे नुकत्याच पार पडलेल्या २० व्या भारतीय राष्ट्रीय इनडोअर आईस स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये बाणेर येथील मास्टर सिद्धांत मांडगे याने (१३ ते १४ वयोगट) चार सुवर्णपदके पटकावत लक्षवेधी कामगिरी केली आहे. या स्पर्धेत देशभरातील १९ राज्यांतील सुमारे ७०० खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
देहरादून येथील महाराणा प्रताप स्पोर्ट्स कॉलेजमधील हिमाद्री आईस रिंक येथे आइस स्केटिंग असोसिएशन ऑफ इंडियाने या स्पर्धेचे आयोजन केले होते. बाणेर येथील ‘द ऑर्किड स्कूल’मध्ये आठवीत शिकणाऱ्या सिद्धांतने २० व्या भारतीय राष्ट्रीय शॉर्ट ट्रॅक स्पीड स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये ५०० मीटर आणि ७७७ मीटर रेसमध्ये प्रत्येकी एक सुवर्णपदक जिंकले. याव्यतिरिक्त, त्याने महाराष्ट्र राज्य शॉर्ट ट्रॅक स्पीड स्केटिंग स्पर्धेत आणखी दोन सुवर्णपदके मिळवली.
या यशाचे श्रेय देताना सिद्धांतने त्याचे प्रशिक्षक सुबोध पाटील आणि ओमकार लोंढे यांच्या पाठिंब्याला आणि प्रशिक्षणाला दिले. तसेच, ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते जिहून चाय (कोरिया) यांच्याकडून मिळालेल्या मोलाच्या मार्गदर्शनाचाही त्याने आवर्जून उल्लेख केला.
सिद्धांतच्या या चमकदार कामगिरीमुळे बाणेर, बालेवाडी परिसरात तसेच त्याच्या आप्तेष्टांमध्ये आनंदाचे आणि कौतुकाचे वातावरण आहे. त्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.



More Stories
रणवीर हनुमान तरुण मंडळ वरची तालीम औंध मंडळ वतीने १११ वर्ष निमित्ताने आयोजित बाल चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
*मुळशी तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पेरिविंकलच्या खेळाडूंची दमदार कामगिरी!!*
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!