बाणेर :
बाणेर टेकडी लगतच्या व्हेनेजिया सोसायटी ते कल्पतरू सोसायटी या १८ मीटर रस्त्याचे रखडलेले काम लवकरच पूर्ण होणार असून, यामुळे स्थानिकांना होत असलेली गैरसोय दूर होईल. पुणे महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष मा. बाबुराव चांदेरे यांच्या मार्गदर्शनाखाली, महानगरपालिका अधिकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर युवक अध्यक्ष समीर चांदेरे यांनी आज या कामाची पाहणी केली.
या कामाची पाहणी करताना राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर युवक अध्यक्ष समीर चांदेरे, मनपाचे अधीक्षक अभियंता आशित जाधव, कार्यकारी अभियंता रमेश वाघमारे, उपअभियंता दिलीप काळे आणि योगिता भामरे मॅडम उपस्थित होते.
पाहणी दरम्यान समीर चांदेरे यांनी कामाची सद्यस्थिती जाणून घेतली व अधिकाऱ्यांशी संवाद साधला. पालिका अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले की, प्रलंबित असलेले हे काम प्राधान्याने पूर्ण करण्यात येईल. यामुळे परिसरातील रहदारी सुरळीत होईल आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा आहे.
यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर युवक अध्यक्ष समीर चांदेरे म्हणाले, “हा रस्ता पूर्णत्वास गेल्यानंतर स्थानिक नागरिकांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण होणार आहे. कामाच्या दर्जाबाबत कोणतीही तडजोड होणार नाही, याची आम्ही खात्री करुन घेणार आहोत.”



More Stories
रणवीर हनुमान तरुण मंडळ वरची तालीम औंध मंडळ वतीने १११ वर्ष निमित्ताने आयोजित बाल चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
*मुळशी तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पेरिविंकलच्या खेळाडूंची दमदार कामगिरी!!*
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!