बाणेर :
बाणेर बालेवाडी मेडिकोस असोसिएशनने (बीएमए) यंदाचा डॉक्टर्स डे नेहमीप्रमाणे मोठ्या उत्साहात बाणेर येथील हॉटेल स्पाईस कोर्ट येथे साजरा केला. या कार्यक्रमाला सुमारे २५० डॉक्टर्स उपस्थित होते, ज्यामुळे कार्यक्रमाला एक विशेष रंगत आली होती.
या वर्षीच्या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे असोसिएशनमधील गायक डॉक्टर्सनी सादर केलेला ऑर्केस्ट्रा. सुमारे १४ डॉक्टरांनी या ऑर्केस्ट्रामध्ये सहभाग घेतला आणि वाद्यवृंदासोबत सुरेख गाणी सादर केली. सादरकर्त्यांमध्ये डॉ. सुपेकर (विठू माऊली तू माऊली जगाची), डॉ. सुधीर निखारे (दिवाना हुवा बादल – द्वैतगीत), डॉ. साठे केदार (राधा ही बावरी), डॉ. राजेंद्र जोशी (तेरे जैसा यार कहा), डॉ. अक्षया जैन (आगे भी जाने ना तू), डॉ. सचिन महामुनी (बस एक सनम चाहिये), डॉ. निखिल पर्वते (तू इस तरह से मेरे), डॉ. शिशिर परतने (जहाँ चार यार), डॉ. सवरणी गायकवाड (केहना ही क्या), डॉ. उर्वशी (कॉम्बाईन सॉंग्स), डॉ. रूपाली कारवा, डॉ. आश्रज गायकवाड, डॉ. अमित पारसणीस, डॉ. द्यानराज चौधरी, डॉ. दिपाली अहिरराव आणि डॉ. सौ. निखारे यांचा समावेश होता. डॉ. रूपाली चौधरी यांनी या मनोरंजक सत्राचे उत्कृष्ट सूत्रसंचालन केले.
या प्रसंगी पुणे मनपाचे माजी स्थायी समिती अध्यक्ष श्री. बाबुराव चांदेरे, श्री. राहुल बालवाडकर, श्री. समीर चांदेरे आणि पुणे पीएमसीच्या डॉ. स्वाती बधिये यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. या मान्यवरांच्या उपस्थितीत, असोसिएशनमधील डॉक्टरांच्या कुटुंबातील ज्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक किंवा इतर क्षेत्रांत विशेष प्रावीण्य मिळवले, त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच, डॉ. चौगुले, डॉ. जाधव आणि डॉ. कविता चौधरी यांचाही त्यांच्या योगदानाबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. बबन साळवे यांनी केले, तर डॉ. सुषमा जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले. असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजेश देशपांडे आणि डॉ. प्रिया देशपांडे यांचीही या कार्यक्रमास विशेष उपस्थिती होती. त्यांनी असोसिएशनद्वारे राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांबद्दल माहिती दिली.



More Stories
बालेवाडीत कचरा समस्येवर मोरेश्वर बालवडकर यांचे सहाय्यक आयुक्तांना निवेदन; १५ दिवसांत उपाय न झाल्यास आंदोलनाचा इशारा
नसरापूर येथील चिमुरडीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडीचा मेणबत्ती मोर्चा
गायनातून भाव व्यक्त होणे अत्यावश्यक : पं. उपेंद्र भट सोमेश्वर फाउंडेशनतर्फे २४ व्या ‘पुणे आयडॉल- 2026’ स्पर्धेचे उद्घाटन