बाणेर :
बाणेर बालेवाडी सुस महाळुंगे पाषाण सुतारवाडी सोमेश्वर वाडी औंध येथील नागरिकांसाठी श्री. गणेश कळमकर (सरचिटणीस, भाजपा पुणे शहर) आणि सौ. ज्योती गणेश कळमकर (मा. नगरसेविका, पुणे मनपा) यांच्या वतीने जेबाणेर येथे दि. २ जुलै ते ३ जुलै २०२५ रोजी सकाळी १०:०० वाजता आधार शिबिर आयोजित करण्यात आले आहे, जिथे नागरिक त्यांच्या आधार कार्डशी संबंधित विविध सेवांचा लाभ घेऊ शकतात.
या शिबिरामध्ये खालील सेवा उपलब्ध असतील:
* नवीन आधार कार्ड नोंदणी: १८ वर्षांखालील लहान मुलांसाठी नवीन आधार कार्ड काढण्याची सोय.
* आधार कार्डमध्ये दुरुस्ती/अपडेट: नाव, पत्ता, जन्मतारीख इत्यादी माहिती अद्ययावत करण्याची सुविधा.
* आधार कार्ड व मोबाईल नंबर लिंक करणे: आवश्यक कागदपत्रांसह (मूळ प्रतीसह) मोबाईल नंबर आधारशी जोडता येईल.
आवश्यक कागदपत्रे:
ओळखीच्या पुराव्यासाठी (खालीलपैकी कोणतेही एक):
१) पॅन कार्ड
२) पासपोर्ट
३) कोणतेही वैध सरकारी ओळखपत्र
पत्त्याच्या पुराव्यासाठी (खालीलपैकी कोणतेही एक):
१) वीज बिल
२) गॅस बुकिंग पावती
३) पोस्ट ऑफिस / बँक पासबुक
जन्माच्या पुराव्यासाठी:
१) जन्म दाखला किंवा
२) पालकांचे आधार कार्ड (१८ वर्षांखालील मुलांसाठी)
महत्त्वाची सूचना: कृपया सर्व कागदपत्रांची मूळ प्रत सोबत घेऊन यावे.
हे शिबिर नागरिकांच्या आधार कार्ड संबंधित अडचणी सहज दूर करता याव्यात म्हणून आयोजीत केले असून नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन आपली आधार संबंधित कामे करून घेण्यासाठी आधार कार्ड शिबिराला भेट द्यावी.
– गणेश कळमकर (सरचिटणीस, भाजपा पुणे शहर)


More Stories
पाषाण कार्यालयात जागतिक योग दिनानिमित्त योग शिबिराचे आयोजन
परिहार चौक परिसरातील अतिक्रमणावर कारवाईचे आश्वासन; सनी निम्हण यांचा पाठपुरावा
पेरिविंकल स्कूलमध्ये ‘योगा फॉर हार्मनी, हेल्थ अँड हॅपिनेस’ अंतर्गत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा