बावधन :
चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरिविंकल इंग्लिश मिडियम स्कूल, बावधन, पुणे येथे डॉक्टर्स डे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने शाळेतील इयत्ता ९ वी ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी शिक्षिका व समन्वयकांसोबत चेलाराम हॉस्पिटलला भेट दिली आणि तेथील डॉक्टरांचे समाजासाठी केलेल्या अमूल्य योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी चेलाराम हॉस्पिटलचे CEO डॉ. उन्नीकृष्णन यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांनी वैद्यकीय क्षेत्र हे एक उत्तम आणि समाधानी करिअर म्हणून निवडावे. हे एक सन्माननीय क्षेत्र आहे.” तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना यश मिळवण्यासाठी पालकांचे आणि शिक्षकांचे ऐकणे हाच खरा यशाचा मंत्र असल्याचेही सांगितले.
विद्यार्थ्यांनी डॉक्टरांना काही प्रश्न विचारले, ज्याला डॉक्टरांनी उत्स्फूर्तपणे उत्तरं दिली. अनेक डॉक्टरांनी आपले वैद्यकीय अनुभव विद्यार्थ्यांशी शेअर केले आणि त्यांच्याबरोबर मनमोकळा वेळ घालवला. विद्यार्थ्यांनी डॉक्टरांना गुलाब पुष्प व मिठाई देऊन त्यांचे आभार मानले आणि छायाचित्रे घेतली. शिक्षकांनी देखील डॉक्टरांच्या योगदानाबद्दल आभार व्यक्त करत त्यांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेची जाणीव करून दिली.
संपूर्ण कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्धरीत्या पार पडला. या कार्यक्रमाचे मार्गदर्शन शाळेचे अध्यक्ष मा. राजेंद्र बांदल, संचालिका सौ रेखा बांदल व शिवानी बांदल यांनी केले.
शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती शुभदा कोलते यांच्या नेतृत्वाखाली, शाळेच्या पर्यवेक्षिका प्रज्ञा जोशी, शाळा समन्वयक सायली गायकवाड व शिरीन काझी
यांनी कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला.



More Stories
“उच्च तंत्र की तंत्रमंत्र? अमोल बालवडकरांचा भोंदू खरात सोबत फोटो वरून चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा”
औंध ग्रामदैवत भैरवनाथ महाराज उत्सव ३ मे रोजी; ग्रामसभेत तारीख जाहीर
लहानग्यांच्या स्वप्नांना मिळाले पंख: पेरिविंकल पिरंगुटमध्ये सीनियर केजी ग्रॅज्युएशन डे जल्लोषात साजरा!!!