पिरंगुट : –
“जीवनात आरोग्याची दिशा देणारे डॉक्टर आणि स्वच्छतेची संस्कृती रुजवणारे शिक्षक” या संकल्पनेतून पेरिविंकल इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पिरंगुट येथे डॉक्टर डे अत्यंत प्रेरणादायी पद्धतीने साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती माता आणि भगवान धन्वंतरी यांच्या पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून प्रसिद्ध डॉक्टर डॉ. पंकज चोंबळकर सर ( पिरंगुट जनरल हॉस्पिटल) यांची उपस्थिती लाभली. “डॉक्टर उपचार करतात… पण स्वच्छता आणि योग्य जीवनशैली आजार टाळतात!” या संकल्पनेवर त्यांनी विद्यार्थ्यांना दैनंदिन स्वच्छतेच्या सवयी, योग्य आहार, झोपेचे महत्व, आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे उपाय यावर सोप्या भाषेत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल, आरोग्यदायी आणि यशस्वी आयुष्यासाठी त्यांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आणि ‘सतत हसत राहा… निरोगी राहा…!’ असा सकारात्मक संदेश दिला .विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना दिलेली त्यांची स्पष्ट व शास्त्रीय उत्तरे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक ठरली.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांचे लक्ष वेधून घेतले ते शिक्षकांनी सादर केलेल्या प्रबोधनात्मक लघुनाटिकेने (Skit) “मोबाईलचा अतिवापर आणि त्याचे डोळ्यांवर व आरोग्यावर होणारे दुष्परिणाम” या विषयावर विनोदी संवादांतून, परंतु गंभीर संदेश देत विद्यार्थ्यांना विचार करायला भाग पाडले. “तंत्रज्ञानाचा वापर समजून करा… डोळ्यांची आणि आरोग्याची काळजी घ्या!” असा सकारात्मक संदेश विद्यार्थ्यांच्या मनात ठसवण्यात आला.
कार्यक्रमास शाळेचे आदरणीय संस्थापक श्री. राजेंद्र बांदल, संचालिका रेखा बांदल, संचालिका शिवानी बांदल यांचे मार्गदर्शन मिळाले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्या आसावरी हंचाटे यांच्या मार्गदर्शनाखाली माध्यमिक विभागप्रमुख पूनम पांढरे, प्राथमिक विभागप्रमुख सना इनामदार, पूर्व प्राथमिक विभागप्रमुख पल्लवी नारखेडे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या संलग्न प्रयत्नांनी अत्यंत प्रभावीरीत्या पार पडला. ‘स्वच्छता हीच खरी संपत्ती आहे’ असा संदेश सर्वांनी आत्मसात केला.



More Stories
पुणे आयडॉल २०२६ ची महाअंतिम फेरी १० मे रोजी बालगंधर्व येथे – ५६० स्पर्धकांचा उत्स्फूर्त सहभाग; विविध क्षेत्रातील मान्यवरांना ‘व्हॉइस ऑफ चॉईस’ विशेष पुरस्कार प्रदान करण्यात येणार
राजभवन (लोकभवन) मार्ग विस्तारीकरणाला गती; कामाचा शुभारंभ, वाहतूक कोंडीवर लवकरच दिलासा – नगरसेवक सनी निम्हण यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश
बालेवाडीत कचरा समस्येवर मोरेश्वर बालवडकर यांचे सहाय्यक आयुक्तांना निवेदन; १५ दिवसांत उपाय न झाल्यास आंदोलनाचा इशारा