सुस -1 जुलै 2025. :
1जुलै हा दिवस भारतात डॉक्टर्स डे व चार्टेड अकाउंटन्ट डे म्हणून साजरा केला जातो. चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरिविंकल इंग्लिश मिडीयम स्कूल अँड जुनियर कॉलेजच्या सुस शाखेमध्ये आज मंगळवार दि 1जुलै रोजी जागतिक डॉक्टर्स डे व C.A.डे मोठया उत्साहात व आंनदात साजरा करण्यात आला.
डॉक्टर्स डे व C.A डे चे औचित्य साधून मुलांसाठी वेगवेगळे उपक्रम राबविण्यात आले होते.
या दोन्ही दिवसाचे महत्व लक्षात घेऊन शाळेमध्ये पूर्व प्राथमिक ते इयत्ता 12वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी फ्री डेंटल चेक अप व फ्री आय चेक अप चे आयोजन करण्यात आले होते. तसेच सर्व शिक्षकांसंसाठी मोफत हेल्थ चेकअप चे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरवात सरस्वती पूजन व धन्वंतरी पूजन करून दीपप्रज्वलनाने सर्व उपस्थित डॉक्टर्स व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली. डॉक्टर्स डे चे औचित्य साधून सर्वप्रथम उपस्थित डॉक्टर, C. A व मान्यवारांचा शाल नारळ व पुष्पगुछ व विद्यार्थ्यांनी बनवलेले भेटकार्ड देऊन सत्कार करून आजच्या या दिवशी या सर्वांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात आली . इयत्ता ७ वी च्या विद्यार्थ्यांनी डॉक्टर यांचा सन्मान करत एका डान्स परफॉर्मन्स मधून त्यांच्या प्रति असलेला आदर व्यक्त केला.
पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज येथे भविष्यात विद्यार्थ्यांनी डॉक्टर आणि सीए होण्याचे स्वप्न जागतिक डॉक्टर दिनानिमित्त साकारत आहेत असे उद्गार उपस्थित डॉक्टरांनी काढले.
पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज सुस येथे डॉक्टर दिन येथे आगळावेगळा उपक्रम
2025 मध्ये, आंतरराष्ट्रीय डॉक्टर दिन 1 जुलै रोजी साजरा केला जातो. हा दिवस डॉक्टरांच्या निस्वार्थ सेवेचा आणि समाजाप्रती असलेल्या योगदानाचा गौरव करण्यासाठी समर्पित आहे.
डॉक्टर दिनानिमित्त प्रशालेमध्ये अनेक डॉक्टर उपस्थित होते. त्यात डॉ. शालिनी भार्गव अग्निहोत्री (दंत शल्यचिकित्सक) डॉ. ऐश्वर्या पवार (दंत शल्यचिकित्सक)
चांदिनी शिवाजी सावंत (परिचारिका) सहाय्यक
वैयक्तिक पोषण पथक – डॉ. मोहिनी फुंडे कडाओ (बीएचएमएस, बीडीएस)
डोळे तपासणी पथक
डॉ. पूजा वानखेडे राऊत (एमडी)
सहाय्यक- अनीषा आदींचा समावेश होता.
त्यावेळी सर्व डॉक्टरांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
डॉक्टर हे आपल्या समाजातील एक महत्त्वाचे सदस्य आहेत. ते आपल्याला निरोगी ठेवण्यासाठी अथक परिश्रम घेतात. ते आपल्याला अनेक रोगांपासून वाचवतात आणि जीव वाचवतात हे आठवीचे विद्यार्थी यांनी आपल्या तेरी मिट्टी मे मिल जावा या गीतातून सादर केले
राष्ट्रीय डॉक्टर डे हा दिवस डॉ. बिधान चंद्र रॉय यांच्या जयंती आणि पुण्यतिथीनिमित्त साजरा केला जातो. ते एक महान डॉक्टर, शिक्षणतज्ञ, स्वातंत्र्यसैनिक आणि पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री होते.
रुग्णसेवेचे ज्यांनी अखंड व्रत हाती घेतले असे डॉक्टरांच्या रूपातील देव आम्हास भेटले आपल्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या, निरोगी आयुष्यासाठी मार्गदर्शन करणार्या डॉक्टरांच्या या कार्याचा आणि त्यांच्या योगदानाला मनापासून सलाम करत संस्थेच्या डायरेक्टर शिवानी बांदल मॅडम यांनी डॉक्टर दिनाचे महत्त्व सांगितले.
प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ निर्मल पंडित यांनी हेल्थ इस वेल्थ कशी महत्त्वाची आहे हे सांगून प्रत्येकानी सात्विक आहार, रोज व्यायाम व कामात चिकाटी आणि सातत्याने काम केले तर पुढची पिढी ही खरोखर सुदृढ व निरोगी होऊन यातील अनेक डॉक्टर होऊन समाज घडवतील असे त्यांच्या भाषणात सांगितले.
या डॉक्टर दिनाच्या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन हे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र बांदल सर संचालिका रेखा बांदल, शिवानी बांदल आणि सर्वांना कायम पाठिंबा असणाऱ्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ निर्मल पंडित यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या परिपूर्ण मार्गदर्शनाने व नेतृत्वाखाली पेरिविंकल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज च्या सुस शाखेच्या पर्यवेक्षिका स्मिता श्रीवास्तव, नेहा माळवदे,सचिन खोडके यांच्या सहकार्याने तसेच ग्रीन हाऊस प्रतापगड वॉरियर्स या टीमच्या मदतीने करण्यात आले होते. तसेच सर्व विषयशिक्षक या सर्वांची जिद्द व चिकाटी यांचा मिलाप व सहकार्य आणि उच्च विद्या विभूषित आणि अनुभवी शिक्षकवृंद यांचा सहभाग या त्रिवेणी संगमाने आजचा हा कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने संपन्न झाला. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नववी ची विद्यार्थिनी सना शेख व करण करचे आणि प्राध्यापिका महिमा शर्मा यांनी उत्तमरित्या आणि उस्फूर्तपणे केले.



More Stories
योगीराज पतसंस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप….
पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल, सूस येथे दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा भावस्पर्शी निरोपसमारंभ सोहळा संपन्न.
“शिक्षणाबरोबरच मूल्यसंस्कार घडले तरच विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल होते” – मा. आमदार शरद ढमाले