बाणेर :
बाणेर वाहतूक विभागाचे नवनियुक्त निरीक्षक प्रताप डोंगरे यांची पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल दादा बालवडकर यांनी नुकतीच भेट घेतली. ही भेट बाणेर विभागाच्या वाहतूक कार्यालयात झाली असून, यावेळी बाणेर-बालेवाडी परिसरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध वाहतूक समस्यांवर सखोल चर्चा झाली.
या भेटीदरम्यान, राहुल दादा बालवडकर यांनी बाणेर-बालेवाडीतील वाहतूक समस्येचे गांभीर्य स्पष्ट केले. बालेवाडी आणि बाणेर परिसरात वाहतूक कोंडी प्रचंड होत असून त्यामूळे नागरिक प्रचंड हैराण आहेत. त्यामूळे हा प्रश्न प्राधान्याने मार्गी लावावा असे सांगीतले.
ज्युपिटर हॉस्पिटल ते बालेवाडी फाटा, पॅनकार्ड रोडवरील कळमकर व मुरकुटे गार्डन चौक, आणि बालेवाडी ममता चौक या प्रमुख ठिकाणांवरील वाहतूक कोंडी सोडवण्याला प्राधान्य देण्यात येईल, परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी नागरिकांनीही पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन नवनियुक्त वाहतूक निरीक्षक प्रताप डोंगरे यांनी केले.



More Stories
ममता चौकासह बाणेर-बालेवाडीतील पाच चौकांत सिग्नल यंत्रणा; चार दिवसांत कार्यान्वित होणार, नगरसेवक अमोल बालवडकरांचा पुढाकार
*पेरीविंकल च्या बावधन, सूस, पिरंगुट,पौड, कोळवण व माले या सर्व शाखांमध्ये गांधी-शास्त्री जयंती उत्साहात साजरी!!!*
सत्य, अहिंसा आणि देशसेवेचा संदेश; पेरिविंकल स्कूलमध्ये महात्मा गांधी- लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी