पिरंगुट :
पेरिविंकल इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पिरंगुट येथे दिनांक ३० जून २०२५ रोजी दुपारी १.०० वाजता. इ ९ ,१० च्या विद्यार्थ्यांसाठी व शिक्षकांसाठी ‘सायबर अवेअरनेस आणि एआय बेसिक्स’ या विषयावर माहितीपूर्ण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने करण्यात आली.कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. राजेंद्र बांदल, संचालिका सौ. रेखा बांदल व कु.शिवानी बांदल, तसेच प्राचार्या सौ. आसावऱी हंचाटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
या कार्यशाळेमध्ये डिजिटल मार्केटिंग सल्लागार आणि प्रशिक्षक, तसेच अनुभवी वेबसाईट डिझायनर रितेश शर्मा ,एनआयआयटी फाउंडेशनच्या सेंटर हेड, ज्योती दहीभाते आणि ट्रेनर स्नेहल कुबल यांनी विद्यार्थ्यांना आजच्या डिजिटल जगात सुरक्षित राहण्यासाठी महत्त्वाच्या बाबींचे मार्गदर्शन केले.
रितेश शर्मा सरांनी मार्गदर्शन करताना “सायबर अवेअरनेस विद्यार्थ्यांना आपली वैयक्तिक माहिती कशी सुरक्षित ठेवावी, सायबर धमक्या, ऑनलाईन फसवणूक, सायबरबुलींग आणि अपायकारक कंटेंटपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे हे शिकवले. तसेच, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) ची प्राथमिक माहिती देऊन भविष्यातील डिजिटल बदलांसाठी तयार राहण्याचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले.”
या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये डिजिटल जागरूकता निर्माण झाली असून, त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्या आसावरी हंचाटे यांच्या मार्गदर्शनाखाली माध्यमिक विभागप्रमुख पूनम पांढरे, प्राथमिक विभागप्रमुख सना इनामदार, पूर्व प्राथमिक विभागप्रमुख पल्लवी नारखेडे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.



More Stories
बालेवाडीत कचरा समस्येवर मोरेश्वर बालवडकर यांचे सहाय्यक आयुक्तांना निवेदन; १५ दिवसांत उपाय न झाल्यास आंदोलनाचा इशारा
नसरापूर येथील चिमुरडीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडीचा मेणबत्ती मोर्चा
गायनातून भाव व्यक्त होणे अत्यावश्यक : पं. उपेंद्र भट सोमेश्वर फाउंडेशनतर्फे २४ व्या ‘पुणे आयडॉल- 2026’ स्पर्धेचे उद्घाटन