July 30, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

विघ्नहर्ता नागरी सह पतसंस्था आणि मॉर्निंग ग्रूप पाषाण यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी करिअर विषयी आयोजित व्याख्यानमाला संपन्न..

पाषाण :

विघ्नहर्ता नागरी सह पतसंस्था आणि मॉर्निंग ग्रूप पाषाण,पुणे. यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दिनांक १९.०५.२०२५ रोजी इयत्ता १० आणि १२ च्या विद्यार्थ्यांची करिअर विषयी आणि परीक्षे विषयी भिती,गैरसमज दूर करण्यासाठी व्याख्यान मालेचे आयोजन लोकसेवा इ- स्कूल सूस रोड पाषाण इथे नुकतेच संपन्न झाले.

 

याप्रसंगी पाषाण,सुतारवाडी, सूस,सोमेश्वरवाडी, बाणेर, बालेवाडी, बावधन या भागातील 250 हून अधिक विद्यार्थी आणि पालक सहभागी झाले होते.

या व्याख्यान मालेचे उद्घाटन प्रसिद्ध वक्ते मा. प्राचार्य श्री. गणेशजी शिंदे सर, मा. प्राचार्य संजय कुलकर्णी सर, मा.श्री. नरहरी पाटील सर, राष्ट्रपती पदक विजेते मा.श्री.मधुकर रणपिसे सर, विघ्नहर्ता संस्थेच्या अध्यक्ष श्रीमती भारतीताई विधाते, उपाध्यक्ष मा. प्रकाशजी गायकवाड, सेक्रेटरी सौ मनिषाताई कदम, संचालक मा. रामदासजी कुदळे, मा.श्री.रोहिदास कोकाटे, व्यवस्थापक मा.श्री. सुधाकरजी मोरे, उद्योजक मा.श्री सोमनाथजी कदम,सर्व कर्मचारी,अभीकर्ता प्रतिनिधी तसेच मॉर्निंग ग्रूप चे मा. श्री. जयप्रकाश गिरमकर, मा.श्री.ॲड.संजय दहीभाते , मा श्री.पागिरे सर तसेच विद्यार्थी आणि पालक मोठ्या उत्साहाने आणि मोठ्या संख्येने उपस्थित होते.

व्याख्यानमालेमध्ये प्रथम मा. प्राचार्य गणेशजी शिंदे सर यांनी प्रेरणात्मक विचार सर्व सामान्य माणसांना पटेल आशा भाषेत मांडले. तसेच मा.श्री. संजय कुलकर्णी सर यांनी करिअर विषयी मार्गदर्शन करून पालकांच्या शंकांचे निरसन ही केले.

व्याख्यानमालेचे सूत्रसंचालन मा. श्री. गणेशजी कदम यांनी केले. उपस्थितांचे आभार मा.श्री. शैलेशजी निम्हण यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता श्रीमती भारतीताई विधाते यांनी पसायदान म्हणून केली.