बाणेर :
योगीराज पतसंस्थेला राष्ट्रीय सहकारी बँक फेडरेशनचे उपाध्यक्ष तथा कॉसमॉस बँकेचे माजी अध्यक्ष सी. ए. मिलिंद काळे यांनी सदिच्छा भेट दिली. त्यांचा सन्मान योगीराज पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर तापकीर यांनी केला.
याप्रसंगी मिलिंद काळे यांनी सांगितले की, योगीराज पतसंस्था सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहे. त्यांनी याही पुढे जाऊन मल्टीस्टेट किंवा बॅंकेत संस्थेचे रूपांतर करावे. त्यासाठी लागणारी सर्व मदत बँक फेडरेशनचे माध्यमातून मी सर्व मदत करायला तयार आहे.
ज्ञानेश्वर तापकीर यांनी संस्थेची आर्थिक व सामाजिक क्षेत्रातील कामगिरी सांगितली. आणि काळे यांनी केलेले मार्गदर्शन नक्कीच प्रेरणादायी आहे असे यावेळी सांगितले.
याप्रसंगी उद्योजक अशोक काळे, प्रभाकर कोंढाळकर, देशपांडे साहेब, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गंगणे, शाखा व्यवस्थापिका सीमा डोके व सर्व स्टाफ उपस्थित होते.


More Stories
रणवीर हनुमान तरुण मंडळ वरची तालीम औंध मंडळ वतीने १११ वर्ष निमित्ताने आयोजित बाल चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
*मुळशी तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पेरिविंकलच्या खेळाडूंची दमदार कामगिरी!!*
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!