July 22, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बालेवाडी वेल्फेअर फेडरेशन तर्फे या पावसाळ्यातील वृक्षारोपणाचा शुभारंभ

बालेवाडी :

बालेवाडी वेल्फेअर फेडरेशन तर्फे २०२१ पासून दर पावसाळ्यात बालेवाडी परीसरात वृक्षारोपण करण्यात येते. रस्त्याच्या कडेला, सोसायटीत, अमेनिटी स्पेस व मोकळ्या जागेत दरवर्षी झाडे लावण्यात येतात. आतापर्यंत ११०० पेक्षा जास्त झाडे लावण्यात आली आहेत. सोसायटीचे पदाधिकारी व सर्वसामान्य नागरिक झाडांची काळजी घेतात. त्यामुळे सत्तर टक्के झाडे जगली आहेत.

 

या सिझनचे पहिले वृक्षारोपण पलक मार्ग, बालेवाडी येथील सोसायटींच्या मैदानावर करण्यात आले. ३१ झाडे यावेळी लावण्यात आली. बालेवाडी वेल्फेअर फेडरेशनने ठरविले आहे की ज्या ठिकाणी झाडे जगली नाहीत तेथे यावर्षी पुन्हा झाडे लावून ती वाढविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. यावर्षी 250 ते 300 झाडे लावण्याचा मानस आहे.

वृक्षारोपण यशस्वी होण्यासाठी मोरेश्वर बालवडकर, आशिष कोटमकर, योगेश डुंबरे, सुनिला सप्रे, समाधान गायकवाड, अस्मिता करंदीकर, शुभांगी चपाटे, ॲड. माशाळकर, दफेदार सिंह, अशोक नवाल, वैभव आढाव, योगेंद्र सिंह या फेडरेशनच्या कार्यकर्त्यांनी व परिसरातील नागरिकांनी विशेष श्रम घेतले.

You may have missed