बावधन :
दिनांक १२ जून २०२५ रोजी चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल, बावधन येथील प्री-प्रायमरी विभागाची सुरुवात अत्यंत आनंदात आणि रंगतदार वातावरणात झाली. सकाळी ९ वाजता शाळेचे दरवाजे उघडताच लहानग्यांनी हसतमुखाने शाळेत प्रवेश केला.
शाळेच्या प्रवेशद्वारापासूनच आकर्षक फुग्यांनी, रंगीबेरंगी पताका व फुलांनी केलेली सजावट सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. संपूर्ण शाळा आनंदाने न्हालेली होती. शाळेतील शिक्षकांनी व कर्मचाऱ्यांनी मनापासून तयारी करून सर्व लहानग्यांचे औक्षण करून स्वागत केले. प्रत्येक वर्ग खोली सुंदर रंगीबेरंगी चित्रांनी सजवलेली होती, जे मुलांना शिकण्याच्या प्रवासासाठी प्रेरणा देत होती.
या प्रसंगी शाळेचे अध्यक्ष श्री. राजेंद्र बांदल संचालिका सौ. रेखा बांदल आणि संचालिका शिवानी बांदल यांच्या मार्गदर्शनाखाली हा स्वागत सोहळा उत्साहात पार पडला. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. शुभदा कोलते यांनी उपस्थित पालक आणि विद्यार्थ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आणि शाळेच्या शिक्षणदृष्ट्या भक्कम व प्रेमळ संस्कृतीची ओळख करून दिली.
प्री-प्रायमरी को-ऑर्डिनेटर शिरीन काझी यांनी मुलांसाठी तयार केलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली आणि विद्यार्थ्यांसाठी शाळा म्हणजे आनंदाचे घर हे भान सर्वांना करून दिले. शिक्षकांचा उत्साह, मुलांचे हसरे चेहरे आणि पालकांची समाधानाची भावना यामुळे संपूर्ण वातावरण आनंदमय झाले होते.
या अनोख्या स्वागत सोहळ्याने नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात अत्यंत सकारात्मक आणि उत्साहवर्धक झाली.



More Stories
बालेवाडीत कचरा समस्येवर मोरेश्वर बालवडकर यांचे सहाय्यक आयुक्तांना निवेदन; १५ दिवसांत उपाय न झाल्यास आंदोलनाचा इशारा
नसरापूर येथील चिमुरडीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडीचा मेणबत्ती मोर्चा
गायनातून भाव व्यक्त होणे अत्यावश्यक : पं. उपेंद्र भट सोमेश्वर फाउंडेशनतर्फे २४ व्या ‘पुणे आयडॉल- 2026’ स्पर्धेचे उद्घाटन