महाळूंगे :
पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील महाळुंगे परिसरात ड्रेनेज लाईन खराब झाल्यामुळे नागरिकांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत होता. अनेक घरांमध्ये सांडपाणी शिरत होते, तर काही ठिकाणी पिण्याच्या पाण्यात सांडपाणी मिसळल्याच्या गंभीर तक्रारी समोर आल्या होत्या. या समस्येची गांभीर्याने दखल घेत राष्ट्रवादी महिला काँग्रेस पुणे शहर कार्याध्यक्षा, सौ. पूनम विशाल विधाते यांनी महापालिका अधिकाऱ्यांसोबत तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित या महत्त्वपूर्ण प्रश्नावर त्यांनी तातडीने लक्ष केंद्रित केले. पुणे महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांसोबत त्यांनी महाळुंगे परिसरातील बाधित भागांची पाहणी केली आणि नागरिकांशी संवाद साधला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन, सौ. विधाते यांनी अधिकाऱ्यांना या गंभीर समस्येवर तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी बोलताना सौ. पूनम विशाल विधाते म्हणाल्या, “जनतेच्या सेवेसाठी मी सदैव तत्पर आहे आणि हेच माझे प्रथम कर्तव्य आहे. महाळुंगे येथील नागरिकांना भेडसावणारी ड्रेनेजची समस्या अत्यंत गंभीर आहे आणि यावर तात्काळ तोडगा काढणे आवश्यक आहे. नागरिकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही.”



More Stories
राजभवन (लोकभवन) मार्ग विस्तारीकरणाला गती; कामाचा शुभारंभ, वाहतूक कोंडीवर लवकरच दिलासा – नगरसेवक सनी निम्हण यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश
बालेवाडीत कचरा समस्येवर मोरेश्वर बालवडकर यांचे सहाय्यक आयुक्तांना निवेदन; १५ दिवसांत उपाय न झाल्यास आंदोलनाचा इशारा
नसरापूर येथील चिमुरडीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडीचा मेणबत्ती मोर्चा