September 19, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

पाषाण मध्ये चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी आणि शासकीय दाखले वाटप शिबिराचे रोहन कोकाटे यांचे आयोजन; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पाषाण :

कोथरूड मतदारसंघातील पाषाण परिसरात कृष्णगंगा सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष आणि भाजप युवा मोर्चा उत्तर मंडल अध्यक्ष रोहन कोकाटे यांच्या वतीने कॅबिनेट मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त एका विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात मोफत आरोग्य तपासणी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध शासकीय दाखले वाटपाची सोय उपलब्ध करून देण्यात आली होती.

शिबिराचे उद्घाटन राज्याचे कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी उपस्थित नागरिकांना उत्तम आरोग्य आणि यशस्वी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. अशा उपक्रमांमुळे गरजू नागरिकांना तात्काळ सेवा मिळण्यास मदत होते आणि शासकीय योजनांचा लाभ घेणे अधिक सुलभ होते, असा उत्तम उपक्रम राबवत रोहन कोकाटे यांनी सेवा भावी वृत्ती दाखवली त्याचे कौतुक वाटते असे मत नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी भाजप पुणे शहर सरचिटणीस गणेश कळमकर, उत्तर मंडल अध्यक्ष लहू बालवडकर, महाराष्ट्र प्रदेश ओबीसी सरचिटणीस प्रल्हाद सायकर, प्रकाश तात्या बालवडकर, सचिन दळवी, राहुल कोकाटे, माजी अध्यक्ष सचिन पाषाणकर, शिवम सुतार, मोरेश्वर बालवडकर, निकिता माथाडे, जागृती विचारे, डॉ. प्रियंका पेंडसे, वैदही बापट, प्राजक्ता देवस्थळी,अंबादास कोकाटे, सुरेश कोकाटे, पोपटराव जाधव, दत्तात्रय कोकाटे, ज्ञानेश्वर पारखे, कालिदास कोकाटे गोविंद कोकाटे संत सेवक मारुती कोकाटे, पंढरीनाथ कोकाटे, नवनाथ ववले संदीप कोकाटे, शिवाजी कोकाटे, नाना तापकीर, बाळासाहेब कोकाटे, पप्पू शिंदे, विद्याधर देशपांडे, अनंत जराड, रवी जोरे, नागेश्वर बगाडे, दिगंबर डांगरे, विवेक मेहता, शंकर कोकाटे, अमोल पाटील, रमेश कोकाटे, नारायण कोकाटे, संजय कोकाटे, किशोर कोकाटे, नितीन निमहन, प्रमोद कांबळे, संदीप खारदेकर, उत्तम जाधव, संग्राम कोकाटे, पांडुरंग कोकाटे, सौरभ कोकाटे, कैलाश कोकाटे, खंडू आरगडे, हरी कोकाटे यांच्यासह इतर मान्यवर, कार्यकर्ते आणि स्थानिक व सोसायटीमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

 

You may have missed