June 19, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

सूस शाखेच्या पेरिविंकल इंग्लिश मिडियम स्कूल येथे शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत!!!!

सूस :

चैतन्य विद्या प्रतिष्ठान च्या पेरीविंकल इंग्लीश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज च्या सूस शाखेच्या शैक्षणिक वर्ष 2025-26 चा पहिला दिवस अतिशय जल्लोषात व उत्साहात संपन्न झाला. पेरिविंकल इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, सुस मध्ये सर्व विद्यार्थ्यांचे उत्साहानं स्वागत करण्यात आले.

 

पुन्हा एकदा नवीन शैक्षणिक वर्षात सर्व विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापिका सौ निर्मल पंडित व सर्व शिक्षक यांच्याकडून स्वागत करण्यात आले.
हसत-हसत शाळेत चला,
शाळेचा आज पहिला दिवस झाला! असे म्हणत शाळेची ती पहिली घंटा वाजत सर्व विद्यार्थी जल्लोषात शाळेच्या आवारात उत्साहात आले.

शैक्षणिक वर्ष 2025-26 चा प्रारंभ, यंदा अधिक उत्साही आणि उत्साहपूर्ण वाटत होता. विद्यार्थ्यांमध्ये, शिक्षकांमध्ये आणि पालकांमध्येही आनंद आणि उत्सुकता दिसून येत होती. प्राथमिक व माध्यमिक विभागाचे सत्र आज म्हणजे 10 जून 2025 पासून सुरू झाले आणि मुले बराच काळानंतर शाळेत परतत होती.

विद्यार्थ्यांचे स्वागत आदरणीय मुख्याध्यापिका निर्मल पंडित, विभागप्रमुख श्री. सचिन खोडके, समन्वयक नेहा माळवदे, स्मिता श्रीवास्तव यांनी हसतमुखाने केले. सकाळी लवकरच मुले शाळेच्या प्रांगणात जमू लागली. सर्व सुरक्षिततेचे नियम पाळून विद्यार्थ्यांनी शाळेच्या इमारतीत प्रवेश केला.

शिक्षक विद्यार्थ्यांना आरामदायक वातावरण देण्यासाठी तत्पर होते. औक्षण करून औपचारिक स्वागत समारंभ घेण्यात आला, तसेच विद्यार्थ्यांचे स्वागत टीआरा आणि गुलाबाची फुले देऊन करण्यात आले. विद्यार्थ्यांना त्यांच्या नवीन वर्गशिक्षकांशी ओळख करून देण्यात आली.

नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना वातावरणात लवकर रुजू होता यासाठी काही जुन्या विद्यार्थ्यांची नेमणूक मदतीसाठी करण्यात आली. विद्यार्थ्यांनी त्यांच्या नवीन शिक्षकांशी व सहकाऱ्यांशी संवाद साधण्यात खूप मजा केली. ते खूप आनंदी होते आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा शाळेत येण्यासाठी उत्सुक होते.

पेरिविंकल शाळेमध्ये दरवर्षी नविन विद्यार्थ्यांचे उत्साहातच स्वागत होत असते-यावर्षीही (२०२५-२६) मध्ये आमच्या उत्कृष्ट शाळेमध्ये विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ करण्यात आला. सर्व नविन विद्यार्थ्यांचे तिलक लाइन औक्षण करण्यात आले. यामागचे उद्देश विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशीच शाळेविषयी ओढ लागणे, आपले ध्येय साध्य करणे तसेच आनंददायी सकारात्मकता वातावरणात अभ्यास करणे. विदयार्थ्यांचा पहिलाच दिवस असल्याने ते अतिशय उत्साहात होते.

आपल्या शैक्षणिक वर्षाला उज्ज्वल आणि आनंददायी सुरुवात व्हावी हीच शुभेच्छा शाळेचे संस्थापक यांनी व्यक्त केली.

या स्वागत समारंभांचे आयोजन चैतन्य विद्‌या प्रतिष्ठानाचे अध्यक्ष व संस्थापक मा.श्री राजेंद्र बांदल सर, संचालिका सौ. रेखा बांदल यांच्या मार्गद‌र्शनाने व शाळेच्या मुख्याध्यापिका का सौः निर्मल पंडित यांच्या नियोजनाने तसेच. पर्यवेक्षिका सौ स्मिता श्रीवास्तव, नेहा माळवदे ,सचिन खोडके यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षकवृंद, सहकारी यांच्या सहकार्याने सर्व विदयार्थ्यांचा स्वागत समारंभ उत्साहात संपन्न झाला.