म्हाळुंगे :
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पुणे शहर युवक अध्यक्ष समीर चांदेरे यांनी नुकतीच म्हाळुंगे येथील पॅव्हिलियन रेसिडेन्सीला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी सोसायटीमधील सन्माननीय पदाधिकारी आणि नागरिकांशी परिसरातील नागरी प्रश्नांवर मनमोकळी चर्चा केली.
यावेळी नागरिकांनी त्यांच्या स्थानिक समस्या, अपेक्षा आणि परिसरातील विकासकामांबाबत आपले मुद्दे मांडले. समीर चांदेरे यांनी नागरिकांच्या भावना आणि समस्या गांभीर्याने घेतल्या. पुणे महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष मा.बाबुराव चांदेरे यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित विभागांमार्फत या समस्यांची लवकरात लवकर सोडवणूक करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, असा विश्वास त्यांनी उपस्थितांना दिला.
सोसायटीमधील नागरिकांनी दाखवलेला विश्वास आणि चर्चेसाठी वेळ दिल्याबद्दल समीर चांदेरे यांनी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले. या भेटीमुळे नागरिक आणि राजकीय प्रतिनिधी यांच्यातील संवाद अधिक दृढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.





























More Stories
तायक्वांदो चॅम्पियनशिपमध्ये पेरिविंकल पौडच्या विद्यार्थ्यांची दमदार कामगिरी
सूस-नांदे परिसरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांचा आणि सनीज वर्ल्डचा पुढाकार
“तायक्वांदोच्या मैदानात पेरिविंकलचा दबदबा; १६ पदकांची शानदार कमाई!”