बालेवाडी :
बालेवाडी गावठाण, भीमनगर येथे सर्व महापुरुषांच्या जयंती निमित्त आयोजित “बालेवाडी गावठाण संयुक्त जयंती महोत्सव २०२५” मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या महोत्सवात भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी गौतम बुद्ध यांच्या जयंतीच्या निमित्ताने भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत भगवान गौतम बुद्ध यांच्या सुंदर मूर्तीवर जेसीबीच्या सहाय्याने पुष्पवृष्टी करण्यात आली, ज्यामुळे वातावरण भक्तिमय झाले होते. उपस्थितांनी भगवान बुद्धांना आदराने अभिवादन केले. या भव्य मिरवणुकीचे आयोजन भीमरत्न तरुण मंडळ आणि रमामाता महिला मंडळ यांनी संयुक्तपणे केले होते, ज्यांचे नियोजन उत्कृष्ट होते.
तसेच सुप्रसिद्ध गायक श्री आनंदजी शिंदे यांच्या भीमगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यांच्या दमदार आवाजाने आणि प्रभावी गायकीने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले आणि भीममय वातावरण निर्माण झाले. कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी खास निमंत्रित केलेले आनंदजी शिंदे यांचे स्वागत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पुणे शहर उपाध्यक्ष राहुल दादा बालवडकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर उपाध्यक्ष राहुल दादा बालवडकर म्हणाले की, “भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त बालेवाडी गावठाण येथे आयोजित करण्यात आलेला महापुरुषांचा संयुक्त जयंती महोत्सव अत्यंत प्रेरणादायी आणि यशस्वी ठरला. या कार्यक्रमाच्या आयोजकांना आणि सहभागी झालेल्या सर्वांना माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा!”
या महोत्सवात प्रसिद्ध व्याख्याते डॉ. नागेश गवळी यांचे व्याख्यान आणि सादरकर्ते किरण पाटील यांनीही सहभाग घेतला. अनेक मान्यवरांनी या कार्यक्रमाला भेट देऊन भगवान गौतम बुद्ध यांना अभिवादन केले.



More Stories
पाषाण कार्यालयात जागतिक योग दिनानिमित्त योग शिबिराचे आयोजन
परिहार चौक परिसरातील अतिक्रमणावर कारवाईचे आश्वासन; सनी निम्हण यांचा पाठपुरावा
पेरिविंकल स्कूलमध्ये ‘योगा फॉर हार्मनी, हेल्थ अँड हॅपिनेस’ अंतर्गत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा