April 6, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

औंध ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराजांचा उत्सव ११ मे रोजी!

औंध :

औंध ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराजांचा वार्षिक उत्सव यंदा मे महिन्यातील दुसऱ्या रविवारी, म्हणजेच ११ मे २०२५ रोजी मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. औंधगाव विश्वस्त मंडळ आणि ग्रामस्थांच्या संयुक्त बैठकीत ही तारीख निश्चित करण्यात आली.

 

परंपरेनुसार, भैरवनाथ मंदिरात ग्रामस्थांची ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत सर्वानुमते उत्सवाची तारीख ठरवण्यात आली. तत्पूर्वी, नीलकंठेश्र्वर मंदिरात सर्व आसमधनी, विश्वस्त आणि ग्रामस्थांच्या हस्ते श्री गणेश पूजन आणि शिवपूजन विधिवत पार पडले.

यावेळी परंपरागत पंचांग पूजन आणि वाचन करण्यात आले. त्यानंतर औंधगाव विश्वस्त मंडळाच्या अहवाल वाचनासह मागील वर्षाच्या जमाखर्चाचा आढावा सादर करण्यात आला. गावच्या विविध समस्यांवर आणि ग्रामस्थांच्या सूचनांवर सखोल चर्चा झाली. उपस्थितांनी आपले मनोगत व्यक्त केले.

विश्वस्त मंडळाच्या वतीने यावेळी उपस्थित ग्रामस्थांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्ष राहुल प्र. गायकवाड, सचिव गिरीश जुनवणे, खजिनदार हेरंब कलापुरे, विश्वस्त योगेश जुनवणे, महेंद्र जुनवणे, विकास गायकवाड, सागर गायकवाड, सुप्रिम चोंधे, विलास रानवडे, सुशिल लोणकर, सोपान राऊत यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून उत्सवाच्या तयारीबाबत चर्चा केली आणि ११ मे २०२५ या तारखेची घोषणा केली.

या बैठकीमुळे ग्रामस्थांमध्ये उत्सवाच्या तयारीला आतापासूनच उत्साह संचारला आहे.