म्हाळुंगे :
छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनाचे औचित्य साधून म्हाळुंगे (पाडाळे) येथे गड संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या ‘नाद गडांचा ग्रुप’ आणि काळुराम गायकवाड सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
या शिबिरास आमदार शंकर मांडेकर, सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रमीक गोजमगुंडे आणि माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांसारख्या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्या प्रेरणादायी उपस्थितीमुळे रक्तदात्यांमध्ये उत्साह संचारला होता.
चाकण ब्लड बँकेच्या सहकार्याने या शिबिरात रक्त संकलन करण्यात आले. समाजासाठी योगदान देण्याच्या उदात्त हेतूने उत्स्फूर्त प्रतिसाद देत तब्बल ७५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. या सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेतल्याबद्दल मान्यवरांनी रक्तदात्यांचे कौतुक केले.
याप्रसंगी ‘नाद गडांचा ग्रुप’चे सर्व सदस्य आणि म्हाळुंगे गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रक्तदान शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल नाद गडांचा ग्रुप आणि काळुराम गायकवाड सोशल फाउंडेशन यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.


More Stories
पाषाण कार्यालयात जागतिक योग दिनानिमित्त योग शिबिराचे आयोजन
परिहार चौक परिसरातील अतिक्रमणावर कारवाईचे आश्वासन; सनी निम्हण यांचा पाठपुरावा
पेरिविंकल स्कूलमध्ये ‘योगा फॉर हार्मनी, हेल्थ अँड हॅपिनेस’ अंतर्गत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा