सुतारवाडी :
सुतारवाडी येथे गुढीपाडव्याचे औचित्य साधून श्री. पुणे शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरद पवार पक्ष) सरचिटणीस योगेश सुतार आणि समता बचत गटाच्या अध्यक्षा कोमल योगेश सुतार यांच्या वतीने परिसरातील नागरिकांच्या सेवेसाठी स्वखर्चातून दोन रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले. हा लोकार्पण सोहळा सुतारवाडी येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
“आज गुढीपाडव्याच्या या शुभदिनी सुतारवाडी आणि परिसरातील नागरिकांच्या सेवेसाठी दोन रुग्णवाहिका समर्पित करताना मला अत्यंत आनंद होत आहे. आम्ही हा छोटासा प्रयत्न करत आहोत. परिसरातील लोकांना तातडीने आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी, वेळेवर रुग्णालयात पोहोचता यावे, हाच आमचा उद्देश आहे.
– योगेश सुतार
सरचिटणीस, पुणे शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरद पवार पक्ष)
योगेश सुतार आणि कोमल योगेश सुतार यांच्या या सामाजिक कार्याचे सर्व उपस्थितांनी कौतुक केले. परिसरातील नागरिकांसाठी ही रुग्णवाहिका सेवा अत्यंत उपयुक्त ठरेल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर गरजूंसाठी ही आरोग्यसेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
या सोहळ्यास समाजभूषण शांताराम महाराज निम्हण, पांडुरंग आप्पा दातार, संतसेवक मारुती कोकाटे, हभप राजेंद्र महाराज दहिभाते, ह भ प दत्तात्रेय महाराज दहिभाते, हभप बाळासाहेब सुतार, हभप विठ्ठल चिंतामण सुतार, हभप दिलीप रणपिसे, हभप मधुकर रणपिसे, हभप पोपटराव जाधव, हभप उद्धव गोळे, हभप खंडूजी आरगडे, हभप सचिंद्र महाराज रणपिसे यांसारख्या अनेक मान्यवर संतांची प्रमुख उपस्थिती होती.
याव्यतिरिक्त माजी नगरसेवक प्रमोद अण्णा निम्हण, माजी नगरसेवक तानाजी भाऊ निम्हण, माजी नगरसेवक सनी निम्हण, माजी नगरसेविका रोहिणी ताई चिमटे, बालम तात्या सुतार, किशोर भाऊ कांबळे (पुणे शहर युवक अध्यक्ष), राहुल दादा कोकाटे, गोविंद तात्या रणपिसे, संजय आप्पा निम्हण, बाळासाहेब रानवडे, सकाळचे पत्रकार बाबासाहेब तारे, पोलीस पाटील उमेश भाऊ गुजर, सचिन पाषाणकर, संतोष सुतार, तुकाराम सुर्वे, राजाभाऊ सुतार, शाम दादा रणपिसे, जयसिंग दांगट, खंडू सुतार, ज्ञानोबा रणपिसे, दत्तात्रय रणपिसे, सुनील खेडेकर, पांडुरंग रणपिसे, संजय दहीभाते, जया दादा निम्हण, सुरेश कोकाटे, अजय दादा निम्हण, जयसिंग सुतार, सखाराम जाधव, अशोक दळवी, सचिन दळवी, रोहन दादा कोकाटे, विनोद खेडेकर, अंकुश रणपिसे, नारायण सुतार, महेश सुतार, सुनील भेगडे, खेमराज रणपिसे, ललित निम्हण, शैलेश निम्हण, अशोक दादा रणपिसे, विठ्ठल आण्णा सुतार, भगवान सुतार, वाढेश्वर सुतार, आप्पा सुतार, शिवाजी कोकाटे, रोहिदास कोकाटे, ज्ञानेश्वर सुतार, रमेश सुतार, मारुती सुतार, शाम सुतार, रवी सुतार, शंकर सुतार, शुभम सुतार, सुरेश खेडेकर, मोहन सुतार, सुनिल सुतार, सुदाम सुतार, दिलीप सुतार, अमर रणपिसे, रविंद्र रणपिसे, सागर सुतार, प्रदीप सुतार आणि सुतारवाडी, पाषाण व सोमेश्वरवाडी येथील ग्रामस्थ तसेच योगेश सुतार युवा मंचचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
More Stories
सूस येथे BBSM 2025 क्रिकेट लीगचा चौथा पर्व उत्साहात संपन्न, पुरुष विभागात गंगा अॅक्रोपोलिस तर महिला विभागात राहुल आर्कस सोसायटीने पटकावले विजेतेपद..
लहू बालवडकर सोशल वेलफेअर आयोजित Pharmathon 2.0 ला मोठा प्रतिसाद ; 6000 पेक्षा अधिक धावपटूंनी घेतला जोशात सहभाग..!
सूस घनकचरा प्रकल्प आजच बंद करा, अन्यथा उद्या प्रकल्पाविरोधात उभा राहण्याचा कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांचा पालिका अधिकाऱ्यांना इशारा..