बालेवाडी :
बालेवाडी गाव येथील प्रमुख चौकातील अनेक दिवसांपासूनच्या खराब रस्त्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुलदादा बालवडकर यांनी तातडीने हालचाल केली. त्यांच्या प्रयत्नांमुळे या प्रमुख रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण झाले असून, आजूबाजूच्या परिसरातील राडारोडा साफ करून सुशोभीकरण देखील करण्यात आले आहे.
गावातील प्रमुख चौक हा नेहमीच गावाची ओळख आणि शोभा वाढवणारा असतो. मात्र, बालेवाडी गावातील प्रमुख रस्त्याची दुरवस्था झाल्यामुळे नागरिकांना मोठी गैरसोय सहन करावी लागत होती. यासंदर्भात अनेक नागरिकांनी राहुलदादा बालवडकर यांच्याकडे तक्रार केली होती. नागरिकांच्या अडचणींची जाणीव होताच राहुलदादा बालवडकर यांनी त्वरित कार्यवाही करत रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम हाती घेतले.
पुणे महानगरपालिका स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर युवक अध्यक्ष समीर चांदेरे यांच्या सहकार्याने हे काम यशस्वीरित्या पूर्ण झाले. केवळ रस्त्याचे डांबरीकरणच नव्हे, तर परिसरातील अनावश्यक राडारोडा हटवून या भागाचे सुशोभीकरण देखील करण्यात आले आहे. यामुळे आता या चौकाला एक नवीन आणि आकर्षक रूप प्राप्त झाले आहे.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी