बाणेर :
पुणे शहर भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस गणेश कळमकर आणि माजी नगरसेविका सौ. ज्योती गणेश कळमकर यांच्या वतीने राज्याचे कॅबिनेट मंत्री मा. श्री. चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे महानगरपालिका हद्दीमधील बाणेर-बालेवाडी भागातील स्मार्ट सिटी अंतर्गत पूर्ण झालेल्या १५ प्रकल्पांचे तातडीने डागडुजी करून लोकार्पण करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे करण्यात आली आहे.
या संदर्भात सौ. ज्योती गणेश कळमकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले आहे. या पत्राची दखल राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने घेतली असून, त्यांनी पुणे महानगरपालिका आयुक्तांना या प्रकरणी योग्य कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.
सौ. ज्योती गणेश कळमकर यांनी पत्रात नमूद केले आहे की, बाणेर आणि बालेवाडी परिसरात स्मार्ट सिटी योजनेतंर्गत कम्युनिटी फार्मिंग, सायन्स पार्क, बुकझेनिया, स्पेशली एबल्ड पार्क, एन्व्हायरमेंट पार्क, ऑगमेंटेड रियालिटी पार्क, डिफेन्स थीम आणि आपत्कालीन व्यवस्थापन केंद्रासह अग्निशमन दल केंद्र असे एकूण १५ प्रकल्प पूर्ण होऊन तीन ते चार वर्षे झाली आहेत. मात्र, अद्याप या प्रकल्पांचे उद्घाटन न झाल्याने ते धूळखात पडून आहेत.
या प्रकल्पांवर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले आहेत आणि आता त्यांची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे या प्रकल्पांची तातडीने दुरुस्ती करून पुढील तीन वर्षांच्या देखभालीसाठी ५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करावा, अशी मागणी सौ. ज्योती कळमकर यांनी केली आहे. या प्रकल्पांचे उद्घाटन झाल्यास नागरिकांना त्याचा लाभ मिळू शकेल, असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
भाजपा पुणे शहर सरचिटणीस गणेश कळमकर आणि माजी नगरसेविका सौ. ज्योती कळमकर यांनी राज्याचे कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बाणेर बालेवाडी मधील या प्रकल्पांना गती मिळवून देण्यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पत्राची दखल घेतल्यामुळे आता या प्रकल्पांच्या उद्घाटनाचा मार्ग लवकरच मोकळा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांसाठी सुविधा उपलब्ध होणार आहेत.
More Stories
सुस-महाळूंगे बॉर्डर सोसायटिज असोसिएशनची सर्वसाधारण सभा संपन्न; आगामी महानगरपालिका निवडणुकीत बाबूराव चांदेरे यांना पाठिंबा..
कोथरूड विधानसभासह पुण्यात कुठेही पाणी साचू नये याची दक्षता घ्या! नामदार चंद्रकांतदादा पाटील
सोमेश्वर फाऊंडेशनच्या आयोजित पुणे आयडॉल स्पर्धेचा समारोप..’व्हाईस ऑफ चॉइस’ पुरस्काराने डॉ. विनय थोरात, शिवानी पांढरे, निलेश निकम, अॅड. शितल कुलकर्णी यांचा सन्मान