March 14, 2025

Samrajya Ladha

बाणेरमध्ये महिला दिनाचा उत्साह; बचत गटांच्या उपक्रमांना मोठा प्रतिसाद

बाणेर : 

जागतिक महिला दिनानिमित्त पुणे जिल्ह्यातील बाणेर येथे महिला बचत गटांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. अहिल्या, जिजाऊ आणि रणरागिणी या महिला बचत गटांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमांना महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

 

या कार्यक्रमात महिलांसाठी हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने मलेरिया चाचणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. महिला सक्षमीकरणावर मार्गदर्शन करणारे प्रशिक्षणही यावेळी देण्यात आले.

या कार्यक्रमाला सरला चांदेरे, ज्योती कळमकर, पुनम विधाते, हर्षदा थिटे, ज्योती चांदेरे आणि सीमा शिंदे या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. बचत गटाच्या ज्योती भिंगारे, समाज विकास विभागाच्या विद्या गुंजाळ आणि वैशाली यांनीही कार्यक्रमाला हजेरी लावली.

अहिल्या बचत गटाच्या अध्यक्षा सजना भुजबळ यांनी या कार्यक्रमाची संकल्पना मांडली आणि त्यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. मान्यवरांचे स्वागत सजना भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. अहिल्या, जिजाऊ आणि रणरागिणी या बचत गटांमधील महिलांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.