March 14, 2025

Samrajya Ladha

बालेवाडीत भूमाता कृषी मंचाच्या वतीने वाईट प्रवृत्तींची होळी

बालेवाडी :

बालेवाडी येथे भूमाता कृषी मंचच्या वतीने वाईट प्रवृत्तींची होळी करण्यात आली. या होळीत वाल्मीक कराड, प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकर यांच्या प्रतिमांचे दहन करण्यात आले.

 

यावेळी जिल्हाध्यक्ष अनिल बालवडकर, हरिभक्त परायण संजय बापू वालवडकर, राष्ट्रपती पुरस्कार विजेते श्री रवी घाटे, राजेश चव्हाण, संदीप बालवडकर, मारुती रानवडे आणि श्री शिवराज मित्र मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

या होळीचे आयोजन समाजात पसरलेल्या वाईट प्रवृत्तींना विरोध करण्यासाठी केले गेले होते. या होळीच्या माध्यमातून समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.