बालेवाडी :
बालेवाडी वेल्फेअर फेडरेशनने आठ मार्च रोजी “पोलिस-नागरिक संवाद” आयोजित केला होता. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. बाणेर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप, बाणेर वाहतूक पोलीस विभागाचे प्रमुख शफिल पठाण यांनी वाहतूक, गुन्हेगारी व अतिक्रमणे विषयी विचारलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली.
जगताप साहेबांनी महिला विषयक गुन्हेगारी, सायबर गुन्हे व जेष्ठ नागरिक याबद्दल काय खबरदारी घ्यावी याबद्दल विस्तृत माहिती दिली. सोशल मीडियाचा वापर करतांना काय काळजी घ्यावी याबद्दल पण मार्गदर्शन केले. ज्या ठिकाणी गुन्हे घडण्याचा संभव आहे तेथे पेट्रोलींग वाढविले जाईल. नागरिकांनी ११२ क्रमांकावर संपर्क साधावा व माहिती द्यावी. ताबडतोब कारवाई करण्यात येईल.
राधा चौकात होणाऱ्या वाहतूक कोंडी बद्दल लवकरच उपाय करणार तसेच कोंडी होणाऱ्या रस्त्यांना भेट देऊन, प्रत्यक्ष पाहणी करून उपाययोजना करण्याचे पठाण साहेबांनी सांगितले. काही चौकात सिग्नल बसविण्यात येतील व वाहतुकीला अडथळा येत असेल तर असे अडथळे दूर केले जातील. दोन्हीही पोलिस अधिकाऱ्यांनी नागरिकांसाठी भरपूर वेळ देऊन सर्व प्रश्न ऐकून घेतले व त्याची नोंद करुन कारवाईचे आश्वासन दिले. नागरिकांनी फेडरेशनद्वारा आयोजित उपक्रमाची प्रशंसा केली व पोलिस अधिकाऱ्यांचे आभार मानले.
पाहूण्यांचे स्वागत आयरीस सोसायटीच्या सेक्रेटरी ज्योति मेश्राम यांनी केले तर फेडरेशन तर्फे चेअरमन रमेश रोकडे यांनी प्रास्ताविक करून समारोप व्हाईस चेअरमन अशोक नवाल यांनी केला.
कार्यक्रम सफल होण्यासाठी फेडरेशनचे उपाध्यक्ष परशुराम तारे, सचिव इंद्रजित कुलकर्णी व एस.ओ. माशाळकर, सह सचिव मोरेश्वर बालवडकर व आशिष कोटमकर, खजिनदार दफेदार सिंह, विकास कामत, अस्मिता करंदीकर, शकिल सलाती, वैभव आढाव, शुभांगी इंगवले, योगेंद्र सिंह, सचिन पाटील, राजीव शहा, यश चौधरी आणि ओमप्रकाश वानखेडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
More Stories
कोथरूड विधानसभासह पुण्यात कुठेही पाणी साचू नये याची दक्षता घ्या! नामदार चंद्रकांतदादा पाटील
सोमेश्वर फाऊंडेशनच्या आयोजित पुणे आयडॉल स्पर्धेचा समारोप..’व्हाईस ऑफ चॉइस’ पुरस्काराने डॉ. विनय थोरात, शिवानी पांढरे, निलेश निकम, अॅड. शितल कुलकर्णी यांचा सन्मान
बाणेर येथे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीनिमित्त व्याख्यान; अविनाश धर्माधिकारी प्रमुख वक्ते