April 29, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त पेरीविंकल पौड शाखेमध्ये विविध रोमांचक प्रयोग सादर..

पौड :

पेरिविंकल स्कूल पौड मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्याचे कारण विज्ञानाचे महत्त्वाच्या शोधांबद्दल माहिती आणि त्या दिवसाचे उद्दिष्ट याबद्दल माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे ही होती. संपूर्ण कार्यक्रमाची सुरुवात भारतीय शास्त्रज्ञ सर सी व्ही रमण यांच्या प्रतिमेचे पूजन आणि सरस्वती पूजनाने करण्यात आली. राष्ट्रीय विज्ञान दिन दरवर्षी 28 फेब्रुवारीला भारतीय शास्त्रज्ञ सर सी व्ही रमण यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. सर सी व्ही रमण यांना भौतिक शास्त्रातील नोबेल पारितोषिकही मिळाले होते.

 

आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री दीपक सोनवणे सर( पत्रकार) आणि चैतन्य विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि संस्थापक श्री राजेंद्र बांदल सर यांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्याचबरोबर मान्यवरांचे स्वागतही करण्यात आले.

राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या श्री सोनवणे सर यांनी मुलांना शुभेच्छा दिल्या. श्री.बांदल सरांनी विज्ञान दिनानिमित्त माहिती आणि विज्ञान दिनाचे महत्त्व पटवून दिले.
कार्यक्रमांमध्ये शाळेतील सौ अश्विनी देसाई व श्रेया गडदे यांनी विज्ञान दिनानिमित्त मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमा मध्ये सुषमा दातीर आणि श्रेया गडदे यांनी मिळून मुलांना विविध प्रकारचे प्रयोग तयार करण्यास प्रवृत्त केले.विज्ञान प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी विविध प्रयोग तयार केले होते. या कार्यक्रमातून मुलांमध्ये वैज्ञानिक प्रभावी उपकरणां ची उत्सुकता वाढवण्याचा प्रयत्न केला गेला.

चैतन्य विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष व संस्थापक श्री राजेंद्र बांदल सर तसेच सौ रेखा बांदल मॅडम, शिवानी बांदल मॅडम व मुख्याध्यापिका निर्मल पंडित मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच पर्यवेक्षिका प्राजक्ता वाघवले आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता सातवी मधील विद्यार्थिनी संस्कृती पिंगळे व अन्विता दहिभाते यांनी केले.

You may have missed