बालेवाडी :
मुक्ताई नगर, बालेवाडी येथील महिलांनी परिसरातील पाणीटंचाईच्या समस्येची तक्रार माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांच्याकडे मांडली. त्यांनी तातडीने या समस्येची दखल घेत पुणे महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाचे अभियंते व L&T कंपनीच्या अभियंत्यांसह जागेवर जाऊन पाहणी केली.
यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने नवीन पाईपलाईन टाकण्याच्या सूचना दिल्या. पुढील पाच दिवसांत ही समस्या सोडवली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. या पाहणीदरम्यान पाणी पुरवठा विभागाचे अभियंता अनुप गजेलवार, L&T चे अभियंते मनोज चव्हाण, सचिन नायक, पथ विभाग अभियंता योगिता भामरे तसेच परिसरातील महिला भगिनी उपस्थित होत्या.
प्रामाणिक काम, विकासावर ठाम! – या भूमिकेनुसार नागरिकांच्या समस्या तत्परतेने सोडवण्यासाठी पुढाकार घेतला असून, लवकरच मुक्ताई नगर येथील पाणी समस्या दूर होणार आहे.
– अमोल बालवडकर (माजी नगरसेवक)





























More Stories
बाणेर जलतरण तलावात दीड लाखाचे युनिट साडेनऊ लाखांना? कोथरूडमधील जलतरण तलावांच्या कामात ३८ लाखांच्या खर्चावरून अमोल बालवडकर यांची चौकशीची मागणी
कोथरूड मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ९ च्या विकासकामांचा निधी रद्द; राजकीय वैमनस्यातून जनतेच्या कामात खोडा : अमोल बालवडकर
*म्हाळुंगे गावातील रस्ता व ड्रेनेजच्या कामांना गती* *ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्यासोबत म्हाळुंगे गावच्या शिष्टमंडळाची चर्चा*