June 9, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बाणेर मधील 33 वेस्ट ॲव्हेन्यू सोसायटीमध्ये अमोल बालवडकर यांचा नागरिकांसोबत संवाद, नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील…

बाणेर :

बाणेर येथील 33 वेस्ट ॲव्हेन्यू सोसायटीतील रहिवाशांनी विविध नागरी समस्यांबाबत थेट संवाद साधण्यासाठी माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी परिसरातील प्रमुख समस्या मांडत त्यावर तातडीने उपाययोजना करण्याची विनंती केली.

 

नागरिकांच्या समस्या आणि तातडीचे उपाय

यावेळी सोसायटीतील सदस्यांनी रस्त्यावरील खड्डे, एम.एन.जी.एल. गॅस पाइपलाइन कनेक्शन, ड्रेनेज लाईन, रस्त्याचे झाडणकाम, खेळाचे मैदान, कचऱ्याची समस्या, तसेच डासांचा वाढता प्रादुर्भाव यासारख्या समस्यांकडे लक्ष वेधले.

या समस्यांवर त्वरीत उपाययोजना करण्यात येईल आणि नागरिकांना लवकरच दिलासा मिळेल, असे आश्वासन अमोल बालवडकर यांनी दिले.

महत्त्वाच्या विकास प्रकल्पांवर चर्चा

यावेळी नदी सुधार प्रकल्प, रस्ते विकास, पाणीपुरवठा, उद्याने, मेट्रो तसेच प्रभागातील मूलभूत सोयी-सुविधांबाबत सविस्तर चर्चा झाली. तसेच, जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदान कार्ड आणि इतर शासकीय व निमशासकीय सुविधा नागरिकांना कशा उपलब्ध करून दिल्या जातात, याची माहिती देण्यात आली.

विकासकामांचा आढावा आणि भविष्यातील योजना

अमोल बालवडकर यांनी २०१७-२०२२ या कार्यकाळात प्रभागात करण्यात आलेल्या विकासकामांचा आढावा घेतला आणि भविष्यात बाणेर-बालेवाडी-सुस-म्हाळुंगे-पाषाण भागात भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून होणाऱ्या विकास प्रकल्पांची माहिती दिली.

QRT टीमच्या कार्याचे कौतुक

“अमोल बालवडकर QRT TEAM” च्या माध्यमातून नागरिकांच्या तातडीच्या समस्या सोडवल्या जात आहेत. या उपक्रमाचे सोसायटीतील सदस्यांनी कौतुक केले.

वाढदिवसानिमित्त शुभेच्छा

यावेळी सोसायटीतील सदस्यांनी केक कापून अमोल बालवडकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. याबद्दल त्यांनी सर्व सदस्यांचे आभार मानले.