सुस :
सुस आणि म्हाळुंगे परिसरातील नागरिकांना गेल्या अनेक वर्षांपासून ड्रेनेज समस्येचा सामना करावा लागत होता. पावसाळ्यात पाणी तुंबणे, सांडपाणी व्यवस्थापनाचा अभाव आणि अस्वच्छतेच्या समस्या यामुळे स्थानिक नागरिक त्रस्त होते. मात्र, आता या समस्येचा कायमस्वरूपी निचरा होणार आहे.
पुणे महापालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष मा. बाबुराव चांदेरे यांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देत सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या अथक प्रयत्नांना यश आले असून, महापालिकेकडून या भागासाठी आवश्यक निधी मंजूर करण्यात आला आहे. लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती मिळाली आहे.
ड्रेनेज व्यवस्थेच्या नियोजनासाठी आज पुणे महापालिकेचे अधिकारी मा. लांडे साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहर युवक अध्यक्ष समीर चांदेरे यांनी सुस परिसराची पाहणी केली. यावेळी कामाच्या पुढील टप्प्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
सुस आणि म्हाळुंगे भागात आधुनिक आणि सक्षम ड्रेनेज व्यवस्था उभी राहणार आहे. त्यामुळे पावसाळ्यातील पाणी तुंबणे, आरोग्याच्या समस्या आणि अस्वच्छता यांसारख्या अडचणी दूर होणार आहेत. “नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही कधीही मागे हटणार नाही. आपल्या प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत!”
– समीर चांदेरे (युवक अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर)
लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्यामुळे सुस आणि म्हाळुंगे भागातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे.





























More Stories
बाणेर जलतरण तलावात दीड लाखाचे युनिट साडेनऊ लाखांना? कोथरूडमधील जलतरण तलावांच्या कामात ३८ लाखांच्या खर्चावरून अमोल बालवडकर यांची चौकशीची मागणी
कोथरूड मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ९ च्या विकासकामांचा निधी रद्द; राजकीय वैमनस्यातून जनतेच्या कामात खोडा : अमोल बालवडकर
*म्हाळुंगे गावातील रस्ता व ड्रेनेजच्या कामांना गती* *ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्यासोबत म्हाळुंगे गावच्या शिष्टमंडळाची चर्चा*