बाणेर :
बाणेर गावठाण व पॅनकार्ड क्लब रोड परिसरात गेल्या आठवड्याभरापासून अनियमित आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने स्थानिक रहिवासी त्रस्त झाले आहेत. या समस्येच्या पार्श्वभूमीवर, भाजपा पुणे शहर सरचिटणीस गणेश कळमकर यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीस मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप, कार्यकारी अभियंता शंकर कोडूसकर, तसेच श्री. जोशी आणि घोरपडे मॅडम उपस्थित होते.
पाणी समस्येवर उपाययोजना करण्यासाठी कॅबिनेट मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी यापूर्वीच कोथरूडमधील अंबर हॉल येथे बैठक घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, अद्यापही पाणीपुरवठा सुरळीत झालेला नसल्याने आज मंत्री महोदयांच्या निर्देशानुसार पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी बाणेर गावठाण परिसरात प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी नागरिकांशी संवाद साधून त्यांची समस्या जाणून घेतली आणि येत्या चार दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
– गणेश कळमकर (सरचिटणीस पुणे शहर भाजपा)
स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी केली आहे. तसेच, भविष्यात अशा समस्या पुन्हा उद्भवू नयेत यासाठी पाणीपुरवठा विभागाने ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



More Stories
पेरिविंकल स्कूलमध्ये ‘योगा फॉर हार्मनी, हेल्थ अँड हॅपिनेस’ अंतर्गत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
पेरीविंकल पौड शाखेत जागतिक योगा दिन उत्साहात साजरा झाला.
*बावधन शाखेतील पेरीविंकल विद्यालयात योग आणि संगीताचा अनोखा संगम!!!* *झुंबाच्या तालावर विद्यार्थ्यांनी गिरवले योगसाधनेचे संगीतमय धडे!!!*