कोथरूड :
चैतन्य विद्या प्रतिष्ठान च्या बावधन येथील पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल कडून आज बुधवार, दिनांक 05/02/2025 रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह ,कोथरूड येथे नवनिर्वाचित महाराष्ट्र केसरी पै. पृथ्वीराज मोहोळ यांचा पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटस् चे संस्थापक अध्यक्ष मा श्री राजेंद्र बांदल यांच्याकडून ५१०००/- रोख व मानचिन्ह देऊन भव्य सत्कार करण्यात आला.
यावेळी भाषाप्रभू, अध्यात्मिक गुरु, कीर्तनकार अयोध्या येथे कीर्तन करणारे पहिले कीर्तनकार श्री.पंकज महाराज गावडे, माजी गट नेते जिल्हापरिषद शांताराम इंगवले, माजी सभापती बाबासाहेब कांधारे, तसेच मायाताई गावडे, केंद्रीय मंत्री मुरली आण्णा मोहळ यांचे बंधु प्रभाकर मोहोळ, उद्योगपती नंदकुमार वाळंज, नगरसेवक नितीनजी मोरे, उपमहाराष्ट्र केसरी सचिनजी मोहोळ, अध्यक्ष शिवसेना मुळशी तालुका सचिन खैरे, अध्यक्ष भाजपा मुळशी तालुका राजाभाऊ वाघ, नगरसेविका अल्पनाताई वर्पे, गणेश वरपे, एनसीपी पुणे शहर उपाध्यक्ष अभिजीत दगडे, बाजार समिती संचालक रामभाऊ गायकवाड, आदर्श सरपंच नामदेवअण्णा माझीरे, बावधन उपसरपंच बापूसाहेब दगडे, सरपंच भूकुम गौरी भरतवंश, बाळासाहेब विचारे, पत्रकार बंडू दातीर, योगेश सोनवणे तसेच शाळेचे संस्थापक अध्यक्ष मा श्री राजेंद्र बांदल, संचालिका सौ रेखा बांदल, तरूण तडफदार डायरेक्टर शिवानी बांदल व यशराज बांदल तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ निर्मल पंडीत आदी मान्यवर उपस्थित होते. त्याचबरोबर शाळेचे सर्व विभागाचे पर्यवेक्षक, शिक्षकगण, पालकवर्ग व विद्यार्थी हे मोठ्या संख्येने उपस्थित होते .
अपयशाने खचून न जाता प्रयत्नाने यश निश्चित: संपादन करता येते. त्यामुळे कायम प्रयत्न करीत रहा व अपयश आल्यास खचून न जाता अजून मेहनत केल्यास ध्येय व यश निश्चित गाठता येते असा मोलाचा संदेश सर्वाँना देऊन पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूलच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्र केसरी पै. पृथ्वीराज मोहोळ यांना मिळालेली चांदीची गदा हे सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रमुख आकर्षण ठरले.
या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन पेरिविंकल स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. निर्मल पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षिका,कल्याणी शेळके, शिरीन काझी, प्रज्ञा जोशी यांनी केले होते.
More Stories
“मिशन निर्मल” अभियानाचा बाणेर-बालेवाडी मधील १७ वा व १८ वा दिवस — स्वच्छतेसाठी नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग! अमोल बालवडकर यांचा उपक्रम…
पाषाण परिसरातील नागरिकांना दिलासा प्रमोद निम्हण यांच्या प्रयत्नातून ड्रेनेज लाईन कामाचा शुभारंभ..
सूस शाखेतील पेरीविंकल इंग्लिश मिडीयम स्कूल येथे वन्यजीव संरक्षण जनजागृती सप्ताहानिमित्त प्रेरणादायी उपक्रम