September 23, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

पेरिविंकल, सुस शाखेतील १०वी व १२वी च्या विद्यार्थ्यांचा जल्लोषात शाही निरोप समारंभ !!!

सुस :

चैतन्य विद्या प्रतिष्ठान च्या पेरिविंकल इंग्लीश मिडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज च्या सूस शाखेत शनिवार दि.१फेब्रुवारी २०२५ रोजी इ.१०वी व १२ वी च्या विद्यार्थांच्या सन २०२४-२५ या बॅचचा निरोपसमारंभाचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात व थाटात संपन्न झाला.

 

दरवर्षीच्या ठरलेल्या शालेय प्रथेप्रमाणे इयत्ता ९वी व ११वी च्या विद्यार्थ्यांनी इयत्ता १०वी व १२वी च्या सर्व विद्यार्थ्यांना फेटे घालून व पारंपरिक औक्षण करून विद्यार्थ्यांसाठी या खास “शाही-निरोपसमारंभाचे” आयोजन केले होते.

कार्यक्रमाचा शुभारंभ पारंपरिक सरस्वती पूजनाने व दीपप्रज्वलनाने करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रोफेसर डॉ.हरीश नवले (हेड ऑफ द डिपार्टमेंट ऑफ फिलॉसॉफी S.P.P.U.) श्री सुनील जाधव ( उपसरपंच, नांदे गाव,तालुका मुळशी) यांच्या समवेत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री राजेंद्रजी बांदल, संचालिका सौ रेखा बांदल आणि कुमारी शिवानी बांदल ,शाळेच्या मुख्याध्यापिका सौ निर्मल पंडित आदी मान्यवर उपस्थित होते.

शाळेच्या अगदी प्रवेश द्वारापासूनच सर्व मान्यवरांचे व सर्व विद्यार्थ्यांचे अत्यंत उत्साहात व थाटात स्वागत करण्यात आले होते. सर्व मान्यवरांच्या हस्ते १० वी व १२वी च्या सर्व विद्यार्थ्यांना शाळेकडून आठवण म्हणून भेटवस्तू प्रदान करून विद्यार्थ्याचे कौतुक करण्यात आले.

यावेळी शाळेतर्फे उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
त्यानंतर विद्यार्थ्यांनी शाळेबद्दल व शिक्षकांबद्दलचे त्यांचे मनोगत व्यक्त करून आपल्या भावनांना वाटमोकळी करून दिली.आनंद व दुःख या दोन्ही संमिश्र भावना व शिक्षकांप्रती असलेला आदर विद्यार्थ्यांनी व्यक्त केला. तसेच इ.१०वी व १२वी च्या वर्गशिक्षिका यांनी देखील विद्यार्थ्यांप्रती असलेली आत्मयीता व्यक्त करून परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.

शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी वर्षभरात राबवलेल्या उपक्रमांना उजाळा देऊन यात महत्वाचे योगदान असलेल्या संस्थेचे, मान्यवरांचे व सर्व स्टाफचे आभार मानून सर्व विद्यार्थ्यांना येणाऱ्या परीक्षेसाठी शुभेच्छा देऊन पुढील वाटचालीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या व यूनिवर्सिटी कडे वाटचाल असल्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सुस ब्रांच सज्ज असल्याची ग्वाही दिली.

संस्थेच्या संचालिका सौं रेखा बांदल यांनी सर्व विद्यार्थ्यांना जीवनाच्या पेपर मध्ये यशस्वी होऊन उंच शिखर गाठा व शाळेचे व पालकांचे नाव उज्वल करा असा मोलाचा संदेश सर्वांना दिला.

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री राजेंद्र बांदल सर यांनी ” गुरूंच्या प्रती कायम विश्वास ठेवला तर अर्ध यश त्यातच मिळाल्यासारखे आहे “है एका सुंदर कथेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पटवून दिले. आपल्या शिक्षणाचा व ज्ञानाचा उपयोग नेहमी देशसेवेसाठी, समाजसेवेसाठी व्हायला हवा,”असा मोलाचा संदेश देऊन सर्वांना शुभेच्छा दिल्या.

आज बसलेल्या सर्व मान्यवरांचा आदर्श ठेऊन उद्या अनेक मान्यवर या शाळेमधून निर्माण होतील व लाल दिव्याच्या गाडीमधून उतरतील ,असा विश्वास कॉलेज चे हेड ऑफ द डिपार्टमेंट श्री सचिन खोडके सरांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला.

तसेच आजच्या या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे प्रोफेसर डॉ.हरीश नवले यांनी सर्व विद्यार्थ्यांना अत्यंत मोलाची शिकवण दिली की ,

“विद्यार्थ्यांनी आपल्या अंगी कावळया सारखी_ तीक्ष्ण नजर , बगळयासारखी_ एकाग्रता व श्र्वानासारखी _सतर्कता हे गुण अंगीकारले पाहिजेत.” दैनंदिन आयुष्यातील अल्पाहराचे व गृहत्यागाचे महत्त्व सांगून सर्वांना भावी परीक्षेसाठी व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या .

श्री सुनील जाधव यांनी देखील आपल्या मनोगतातून आजच्या निरोप समारंभा चे, विद्यार्थ्यांचे मनापासून कौतुक केले, आणि “परत एकदा विदयार्थी होऊन या शाळेचा एक भाग बनावा “,अशी निर्मळ इच्छा देखील व्यक्त केली.

या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ निर्मल पंडीत यांच्या अध्यक्षतेखाली HOD सचिन खोडके, नेहा माळवदे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,  इयत्ता ९ वी व ११ वी विद्यार्थ्यांच्या सहकार्याने अत्यंत शिस्तबद्ध पध्तीने करण्यात आले होते. इयत्ता १०वी व १२वी च्या वर्गशिक्षिका योगिता धाने, स्मिता श्रीवास्तव, वैशाली घाडगे व हिमानी अमेटा यांनी कार्यक्रमात मोलाचा वाटा दर्शवला. कार्यक्रमाची सांगता “हम होंगे कामियाब एक दिन ” या प्रेरणादायी हिंदी गीता ने करण्यात आली. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.प्रफुल्ला पाटील यांनी केले होते.